विधवा सुगंधाबाईने घातली जोडवी,लावली लाल टिकली, घेतले मंगळसुत्र…

नाशिक : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा महिलांसाठी एक ठराव संमत केला.महिलेच्या पतीच्या निधनानंतर तिच्या बांगड्या फोडणे,तिचे जोडवे व इतर आभूषणे काढून घेणे,टिकली अथवा कुंकू पुसण्याच्या प्रथेवर ठराव करून बंदी आणली आहे. महाराष्ट्र शासनाने त्याला अनुसरून एक परिपत्रक काढत राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींने असाच ठरावा करावा असे म्हटले आहे.
ही बातमी समजताच इंदिरानगर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी आपल्या विधवा आईला दाखवले. त्यावर आई श्रीमती सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांनी सुधारणावाद स्विकारला व शासन परिपत्रकाचा सन्मान राखत आपल्यात बदल घडून आणण्याचे ठरविले.
चांदीचे जोडे घेतले व घातलेही. लाल टिकली लावली. इतकेच नाही तर मंगळसुत्रही घेतले. समाज सुधारणेच्या प्रक्रियेत सहभागी झाल्याचा आनंद कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला.

“समाजातील कुप्रथा थांबविण्यासाठी माझा मुलगा अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करतो. आमच्या घरात आम्ही अनेक सुधारणावादी निर्णय घेतले आहे.आपल्या घरातून त्याची सुरुवात करावी म्हणजे समाजात चांगला संदेश जातो. या कुप्रथांमुळे त्रास होत होता. दुय्यम दर्जाची वागणुक मिळत होती.त्यामुळे आज आनंद होत आहे”

श्रीमती सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे.

One thought on “विधवा सुगंधाबाईने घातली जोडवी,लावली लाल टिकली, घेतले मंगळसुत्र…

  1. खुपच छान पराक्रम गाजवला आहे अशा समाज बांधवांचा
    सत्कार झाला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *