राशिभविष्य

गुरूवार, १९ मे २०२२. वैशाख कृष्ण चतुर्थी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००

“आज उत्तम दिवस *संकष्ट चतुर्थी* आहे” मुंबई चंद्र उदय रात्री १०.४७ वाजता. घबाड रात्री ८.२४ पर्यंत आहे. आज ‘साध्य’ योग दुपारी २.५७ पर्यंत आहे त्यानंतर ‘शुभ’ योग आहे.

चंद्रनक्षत्र: पूर्वाषाढा.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चैनीवर खर्च कराल. मौल्यवान खरेदी होईल. मात्र काळजीपूर्वक पाहणी करून घ्या. अचानक धनलाभ घडेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वादाचे प्रसंग येऊ शकतात. प्रवासात काळजी घ्या. व्यसने नकोत. आरोग्य सांभाळा .

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रेमात अपयश येऊ शकते. सोबतचे लोकं अनपेक्षित वागतील. मनाला लावून घेउ नका. जोडीदाराला समजून घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. मेहनत वाढवावी लागेल. गृहसौख्य लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कुटुंबासाठी वेळ द्याल. अपत्यांकडून शुभ समाचार समजेल. महत्वाची कामे पुढे ढकलली जातील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक घडी बसेल. भौतिक सुखे लाभतील. खरेदी होईल. जमिनीची कामे करताना काळजी घ्या.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सुखाचा दिवस आहे. संधीचे सोने कराल. कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील. सट्टा टाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम आर्थिक लाभ होतील. आवडत्या कामासाठी खर्च कराल. कलाकारांना उत्तम संधी मिळतील. प्रलोभनांना बळी पडू नका.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अकल्पित लाभ होतील. आवडते छंद जोपासाल. मनासारखा दिवस व्यतीत कराल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र ग्रहमान आहे. आज महत्वाचे करार नकोत. मन काहीसे अस्वस्थ राहील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम दिवस आहे. आर्थिक प्राप्ती भरपूर होईल. गुंतवणुकीस चांगला कालावधी आहे. मोठा लाभ होऊ शकतो.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) वरिष्ठ अचानक नाराज होऊ शकतात. शत्रू प्रबळ होतील. उपासना केल्यास सौख्य लाभेल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *