पत्नीने केले भयानक कांड, आधी पतीला मारले, नंतर कुऱ्हाडीने केले तुकडे, अन टाकले शोष खड्ड्यात

निर्दयी पत्नीचे बिंग दोन महिन्यांनंतर फुटले

सुरगाणा : प्रतिनिधी
पतीची कुर्‍हाडीच्या सहाय्याने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते गोणीत भरून शोषखड्ड्यात पुरल्याची खळबळजनक घटना सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीरजवळील मालगोंदा येथे घडली. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या खुनाचा काल उलगडा झाला. पोलिसांनी शोषखड्ड्यातून मृतदेह बाहेर काढला असता, फक्त हाडांचा सांगाडा उरला आहे. याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. यशवंत मोहन ठाकरे (वय 42, रा. मालगोंदा) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत यशवंत ठाकरे 14 एप्रिलपासून बेपत्ता होता. त्याच्या वडिलांनी सून प्रभाकडे चौकशी केली असता, गुजरातमधील बिल्लीमोरा येथे तो कामाला गेल्याचे सांगितले. त्यानंतर प्रभादेखील बिल्लीमोरा येथे कामासाठी निघून गेली. पावसाळा सुरू होऊनही आपला मुलगा घरी का आला नाही म्हणून त्याचे वडील दररोज यशवंतच्या पत्नीला विचारत असत; परंतु ती थातूरमातूर कारणे सांगून टाळत देत असे. अखेर यशवंतच्या वडिलांनी पोलिसांत मुलगा बेपत्ता असल्याबाबत तक्रार दिली. घराच्या ओट्यावर शेणाने सारवलेले दिसत असल्याने त्यांनी संशयदेखील व्यक्त केला. पोलिसांनी बिल्लीमोरा येथून प्रभाला तपासासाठी सुरगाणा पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी पंचनामा करत महसूल विभागाला बरोबर घेत घरातील ओसरीवरील खड्डा खोदला. मात्र, मृतदेह आढळला नाही. त्यामुळे पोलिसांनीही प्रभाला सोडून दिले. त्यानंतर प्रभा बिनधास्तपणे वावरत होती.

भावजयीच्या चातुर्याने उकलले गूढ
दोन दिवसांपूर्वी तिची जाऊ मेथी ही पती उत्तमच्या शोधात प्रभाच्या घरी गेली असता, तेथे तिला मृत यशवंतच्या चपला दिसल्या. पण मोठ्या चतुराईने प्रभाने त्या लपविण्याचा प्रयत्न केला. ही बाब मेथीच्या नजरेतून सुटली नाही. तिने ही बाब तिचा पती व मृत यशवंतच्या भावाला सांगितली. दक्षिण दिशेला शौचालयाच्या शोषखड्ड्यात तर काही लपवले नसेल ना, म्हणून त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता, कुजल्याचा वास आला. त्यांना संशय आल्याने त्यांनी माती उकरून पाहिले असता, मृतदेह आढळला. त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. मृताची पत्नी प्रभाला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता, कुर्‍हाडीने डोक्याच्या मागील भागात टोला मारल्याने तो मृत झाल्याची कबुली दिली. पंचनाम्यानंतर शोषखड्ड्यात पुरून ठेवलेला कुजलेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचा केवळ हाडांचा सांगाडा उरला होता.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम परदेशी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. मान, धड, हातपाय याचे तुकडे करून ते गोणी भरुन शोषखड्ड्यात पुरले होते. मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून फॉरेट, औषधे, माती, मुरूम, भाताची फोतरे, प्लास्टिक पिशव्या टाकल्याचे आढळले. हे सर्व एकटी पत्नी करू शकते का? तिला कोणी मदत केली का? याचा पोलिस शोध घेत आहेत. खुनाचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
आरोपी प्रभाचे माहेर डांग या सीमावर्ती भागातील शिलोटमाळ येथे एक ते दीड किलोमीटरवर आहे. पोलिस निरीक्षक राहुल मोरे,  नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित खिरकाडे, संदीप पगारे, रमेश चव्हाण, मनोज चव्हाण, गणेश आव्हाड, लहुदास गायकवाड, रमेश महाले, तसेच फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी तपास करत आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

11 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

11 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

11 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

12 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

12 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

12 hours ago