नाशिक

शिर्डीत बैठक घेऊन विखेंना जाब विचारणार

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत गायकरांचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संस्था व संघटनांच्या राज्यस्तरीय निमंत्रितांची बैठक पुणे येथील सारथी कार्यालयात पार पडली.
या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणासह शिक्षण, रोजगार, आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि महिलांच्या सन्मानाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांंवर सविस्तर चर्चा करून नऊ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. राज्य सरकारने आठ दिवसांत या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा शिर्डीत पुढील बैठक घेऊन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जाब विचारण्यात येईल, असा इशारा मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी दिला.
महाराष्ट्रात मराठा समाजाचे 58 क्रांती मोर्चे निघाले असून, त्यांच्या माध्यमातून समाजाच्या विविध सामूहिक मागण्या शासनासमोर मांडण्यात आल्या होत्या. काही मागण्या पूर्ण झाल्या असल्या तरी अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याची नाराजी बैठकीत व्यक्त करण्यात आली.
गेल्या काही वर्षांत समाजाच्या मूळ मागण्यांपासून लक्ष विचलित होत असून, कायदेशीर व घटनात्मक प्रक्रियेद्वारे सोडवायच्या प्रश्नांंवर अपेक्षित गांभीर्याने काम झाले नसल्याची टीकाही यावेळी क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली.
या बैठकीला राज्याच्या कानाकोपर्‍यांतून मराठा आरक्षणासाठी काम करणारे अभ्यासक, तज्ज्ञ व समन्वयक उपस्थित होते.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदासह मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.
या सर्व मागण्यांवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने बैठक आयोजित करून निर्णय घ्यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. मराठा समाजाच्या आरक्षणासह शिक्षण, रोजगार, आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि महिलांच्या सन्मानाच्या प्रश्नांंवर एकजुटीने लढा देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
मराठा समाजाच्या मूळ मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राज्य सरकारने पुढील आठ दिवसांत सर्व मागण्यांबाबत ठोस निर्णय घ्यावा आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी बैठक लावावी. अन्यथा शिर्डीत पुढील बैठक घेऊन त्यांना जाब विचारण्यात येईल. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचा लढा थांबणार नाही, असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गायकर यांनी दिला.

Will hold a meeting in Shirdi and demand an explanation from Vikhe.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago