नाशिक

पिंपळगावला 100 गॅस सिलिंडर जप्त

पिंपळगाव पोलिसांची यशस्वी कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची विनापरवाना वाहतूक करणार्‍यांविरुद्ध पिंपळगाव पोलिसांनी धडक कारवाई केली. मुंबई-आग्रा महामार्गावरील सिद्धार्थनगर परिसरात केलेल्या या कारवाईत शंभर गॅस सिलिंडर आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले महिंद्रा पिकअप वाहन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत नऊ लाख 34 हजार 600 रुपये आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरगुती गॅस सिलिंडरची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पिंपळगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी सिद्धार्थनगर परिसरात सापळा रचला. संशयित पिकअप वाहन अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये घरगुती वापराचे गॅस सिलिंडर आढळले.
पोलिसांच्या तपासणीत पिकअप वाहनातून प्रत्येकी 14.2 किलो वजनाचे शंभर घरगुती गॅस सिलिंडर वाहून नेले जात असल्याचे निदर्शनास आले. वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी आणि संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्याने पोलिसांनी गॅस सिलिंडर व पिकअप वाहन जप्त केले. या कारवाईत एकूण नऊ लाख 34 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास भोर, पोलीस कर्मचारी विकास वाळुंज, योगेश देशमुख आणि नितीन गाढवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

100 gas cylinders seized in Pimpalgaon.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago