पाचोरे बुद्रुक : बाळासाहेब उगले
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकरी असलेल्या व कोणत्याही व्यवसायातून शासनाला आयकर भरत नसलेल्या शेतकऱ्यांना वर्षास बारा हजार देण्यासाठी शेतकरी सन्मान योजनेद्वारे तिमाही हप्त्यात बँक खात्यात पैसे पाठविण्यास सुरुवात केली असली तरी वृद्ध शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे . केंद्राने मोठा गाजावाजा करत शेतकरी सन्मान योजनेद्वारे तिमाही हप्त्यात दरमहा दोन हजार रुपये देण्यात येईल , असे जाहीर केले होते . त्याप्रमाणे पैसे खात्यावर देण्यास सुरुवात केली .
हेही वाचा : लासलगाव बाह्य वळण रस्ता नवीन सीमांकनामुळे शेतकरी संतप्त
मात्र , आता दर वर्षी या योजनेचे खाते अपडेट न केल्यास या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचा फतवा काढल्याने ज्यांचे खाते अपडेट होईल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे . मात्र , ज्या वयस्कर शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, मोबाइल नंबरला लिंक केले नाही व त्यांच्या हाताचे ठसेही मोबाइल नंबर लिंक करायला संबंधित यंत्रणेवर उमटत नाही ते मात्र यापुढे शेतकरी सन्मानपासून दूर राहून लाभापासून वंचित राहतील असे जाणकारांचे मत आहे .
मोठ्या शहरात वयस्कर लोकांच्या हाताचे ठसे काम करत नसल्यास त्यांच्या डोळ्याची फिंगर फोटोग्राफ घेऊन ओळख पटविण्यासाठी उपयोग होतो . मात्र , ग्रामीण भागात अजूनही सदरची सुविधा नसल्याने वयस्कर शेतकरी सन्मान योजनेपासून दूर राहतील , याबाबत जिल्हाधिकारी नाशिक यांनी लक्ष घालून वयस्कर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा , अशी मागणी जोर धरत आहे.
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…
रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…
नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…
हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ नाशिक : प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार…
सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…