शेन्झेनमध्ये एकाच मंचावर ट्रम्प, जिनपिंग आणि पुतिन
शेन्झेन (चीन) :
चीनमधील शेन्झेनमध्ये येत्या गुरुवारी, दि. 19 नोव्हेंबर रोजी जगातील तीन सर्वात शक्तिशाली नेते एकाच मंचावर येणार आहेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि ही बैठक केवळ एक औपचारिक भेट नाही, तर 1945 च्या याल्टा परिषदेनंतर ऐंशी वर्षांनी जगाची नवी व्यवस्था ठरण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने संपूर्ण जगाचे डोळे या बैठकीकडे लागले आहे. कारण 18-19 नोव्हेंबर रोजी शेन्झेनमध्ये होणार्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य म्हणजेच पेक शिखर परिषदेच्या बाजूला ही पहिलीच त्रिपक्षीय बैठक होणार आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी ही बैठक औपचारिकपणे निश्चित झाल्याची पुष्टी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता ही केवळ अटकळ राहिलेली नाही, तर इतिहास घडवणारी बैठक ठरत आहे.
‘याल्टा 2.0’ बैठक
या बैठकीला ‘नवा याल्टा’ किंवा ‘याल्टा 2.0’ का म्हटले जात आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. फेब्रुवारी 1945 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट, ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि सोव्हिएत नेते जोसेफ स्टॅलिन हे याल्टा येथे भेटले होते आणि त्यांनी दुसर्या महायुद्धानंतरच्या युरोपच्या सीमा, सरकारे आणि नव्या जागतिक व्यवस्थेचा पाया रचला होता आणि नेमकी तीच भीती आज युक्रेन, तैवान, युरोप आणि जपानसारख्या देशांना वाटते आहे की, पुन्हा एकदा तीन महासत्ता त्यांच्या डोक्यावरून त्यांच्या भवितव्याचा निर्णय घेतील का, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी तर उघडपणे इशारा दिला आहे की, हे ‘याल्टा 2, 3, 4’ होऊ देऊ नका, प्रभावक्षेत्रांचे पुनर्वाटप होऊ देऊ नका, तर दुसरीकडे रशियातील राष्ट्रवादी वर्तुळात या बैठकीमुळे उत्साह आहे. कारण युक्रेन युद्ध मॉस्कोच्या अटींवर संपवण्याची संधी त्यांना यात दिसते
आहे.
पण तिन्ही नेत्यांचे अजेंडे पूर्णपणे वेगळे आहेत. हेच या बैठकीचे सर्वात मोठे वास्तव आहे, पुतिन यांना युक्रेनवर चर्चा हवी आहे, ट्रम्प यांना अण्वस्त्र नियंत्रणावर त्रिपक्षीय कराराची इतिहासात नोंद व्हावी असे वाटते आहे, विशेषतः फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिका-रशिया दरम्यानचा न्यू स्टार्ट हा शेवटचा अण्वस्त्र करार संपुष्टात आल्याने आता कोणतीही कायदेशीर मर्यादा उरलेली नाही, तर जिनपिंग यांच्यासाठी ही बैठक सर्वात धोकादायक आहे, कारण चीन स्वतःला लहान देशांचा आवाज म्हणवतो, 1945 मध्ये चीनला याल्टाला बोलावलेही नव्हते, आणि अण्वस्त्र चर्चेत तर चीनचा साठा अमेरिका-रशियाच्या प्रत्येकी 5,000 हून अधिक वॉरहेड्सच्या तुलनेत सुमारे 500 आहे, त्यामुळे बीजिंगला या चर्चेत ओढले जाणे नको आहे, आणि म्हणूनच रॉयटर्ससह अनेक माध्यमांनी म्हटले आहे की, बैठकीचा अजेंडा आणि स्वरूप यावर अखेरपर्यंत चर्चा सुरू होती, आणि व्हाईट हाऊसनेही स्पष्ट केले आहे की, या बैठकीतून कोणताही ठोस अण्वस्त्र करार होण्याची अपेक्षा नाही, ही केवळ संवादाची सुरुवात असू शकते.
Will the world order change again after eighty years?
- डॉ. किशोर पवार उकळत्या पाण्यात केवळ तीन मिनिटे ठेवलेल्या चहाच्या पिशवीतून (टी बॅग) सुमारे…
- रमेश पडवळ - चेतन राजापूरकर नाशिकचा प्राचीन इतिहास केवळ मंदिरे, लेणी आणि शिलालेखांपुरता मर्यादित…
- सीमाताई मराठे अर्थशास्त्र हे केवळ आकड्यांचे खेळ नसते, तर ते सामान्य माणसाच्या ताटातील भाकरीचे…
- राजेश शिरभाते काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष, खासदार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी, इंदिरा…
- अशोक थोरात दुष्काळ, जीवघेणी महागाई यात दिवाळी तर संपली, पण पुढील सहा महिने सर्वांनाच…
विद्यार्थी हा कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाचा महत्त्वपूर्ण आधार असतो. राष्ट्राचे भविष्य…