नाशिक

बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्य

गणेशोत्सवाला प्रारंभ : घरोघरी, आस्थापनांत, सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना

नाशिक : प्रतिनिधी
ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचे मंगलमय वातावरणात घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन झाले. त्याचप्रमाणे विविध सरकारी, निमसरकारी कार्यालयांत गणपती बाप्पा विराजमान झाले. दहा दिवस चालणार्‍या या उत्सवामुळे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले असून,
सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पाचेही धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले असून, शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाचे बाप्पा विराजमान झाले आहेत. शहरात दिवसभर मंडळाच्या गणपतीची मिरवणूक काढत बाप्पा विराजमान झाले.
विधिवत पूजा आणि नैवेद्य दाखवत बाप्पाचे मनोभावे स्वागत करण्यात आले. गणपतीच्या स्वागतासाठी अबालवृध्दांनी जय्यत तयारी केली होती. बच्चेकंपनीचा लाडका बाप्पा येणार असल्याने चिमुकल्यांचीही बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग सुरू होती. आता गणरायाचे आगमन तर झाले आहे मात्र बाप्पाची दहा दिवस सेवा करण्यासाठी भक्तगण तयारी करत आहे. बाप्पाच्या आरतीसाठी रोज लागणार्या प्रसादासाठी भाविकांनी नियोजन करून ठेवले आहे. गणपती आगमनाच्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरू असल्याने बाप्पाच्या स्वागतात काही प्रमाणात विघ्न निर्माण झाले.मात्र भाविकांनी पावसातही मोठ्या जल्लोषात उत्साहात बाप्पाचे स्वागत करत मनोभावे आराधना केली.शुभ मुहूर्तासोबतच दिवसभर बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आज दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार असून यासाठी महानगर पालिका व पोलीस प्रशासन सज्ज आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

15 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

15 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

16 hours ago