नाशिक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

आदिवासी जमीन बळकावल्याचा आरोप

नाशिक : प्रतिनिधी
आदिवासींच्या हक्काच्या जमिनी बेकायदेशीररीत्या बळकावल्याचा आरोप करत एका महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील दुर्घटना टळली.
चांदवड तालुक्यातील कुंडाणे गावातील आणि नाशिक परिसरातील आदिवासींच्या हक्काच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याने, तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कुंडाणे गावातील महिलांचे मागील पंधरा दिवसांपासून गोल्फ क्लब मैदानावर आंदोलन सुरू होते. मात्र, प्रशासकीय पातळीवर या आंदोलनाची दखल घेण्यात न आल्याने महिलांनी सोमवारी (दि. 12) थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रवेशद्वारावर निदर्शने सुरू केली.
यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच आंदोलनकर्त्या संगीत कडाळे यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍यांनी हस्तक्षेप करीत महिलेचे समजूत काढली. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली.

या आहेत मागण्या
कुंडाणेे येथील गट नं. 193/1, 194 व 195 जमिनीची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी, बेकायदेशीर ताबा हस्तांतरण आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, आदिवासी समाजाची बाजू निष्पक्षपणे ऐकून घ्यावी, बोगस आदिवासी जात प्रमाणपत्रांची चौकशी करावी आदी.

अधिकार्‍यांना हाताशी धरून नाशिक शहरालगतच्या आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीररीत्या बळकावण्याचे काम सुरू आहे. यातील काही अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या हे अधिकारी फरार असून, त्यांना शोधून तत्काळ अटक करावी. – सर्जेराव भारमल, सदस्य, बिरसा मुंडा संघटना

 

Woman attempts self-immolation outside the District Collector’s office.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago