महिला गंभीर जखमी…! महिनाभरात घडली दुसरी घटना..
मनमाड : प्रतिनिधी
मनमाड बस आगार हे अपघाताचे ठिकाण होत असून, महिनाभरात या ठिकाणी दोन अपघात घडले असून, यात एक महिला ठार झाली तर काल एक महिला गंभीर जखमी झाली आहे. यात या महिलेचे दोन्ही पाय गेले आहे. लक्ष्मीबाई ताठे असे या महिलेचे नाव असून, या महिलेला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मनमाड बस आगारात कोणत्याही प्रकारची सुरक्षितता बाळगल्या जात नाही. यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आगारप्रमुख यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
मनमाड शहर मुख्य बस स्थानकाचे नूतनीकरण सुरू असून, यामुळे अर्ध्या बस स्थानकातच एसटीचा कारभार सुरू असून, त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात चिखल आहे. यामुळे बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना बसमध्ये बसण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. त्यात सामान जवळील लहान मुले हेही सांभाळून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यात एसटीचालक हे देखील मोठ्या बेदारकारपणे गाडी चालवतात. यामुळे अनेकदा अपघात झाले आहेत. गेल्या महिनाभरात या बसस्थानकावर दोन मोठे अपघात झाले. यात एक महिला जागीच ठार झाली. काल मनमाड आगारची बस रिव्हर्स घेताना झालेल्या अपघातात एका महिलेचे दोन्ही पाय बसखाली आले. यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली.तिला तात्काळ मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात इतका भयंकर झाला की, अपघाताच्या ठिकाणी रक्ताचे थारोळे पडलेे होते. सुरवातीला कोणीही मदत केली नाही. मग काही तरुणांनी गाडी आणून या महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी
मनमाड बस आगारात महिन्याभरात बसने अपघात होण्याची ही दुसरी घटना घडली असून, मागे एक महिला ठार झाली. आज एक महिलेचे पाय गेले, मात्र आगार व्यवस्थापक यावर काहीच उपाययोजना करत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुळात आपल्या बस आगारात येणार्या प्रवाशांना सुरक्षा देण्याची जबाबदारी आगार व्यवस्थापक व प्रशासनाची आहे, मात्र प्रशासन काहीच करत नाही. येणार्या बसेस व्यवस्थित लावाव्यात किंवा या ठिकाणी वॉचमन नेमावा तसेच सुरक्षिततासंदर्भात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…