नाशिक

चोरी करणार्‍या महिला पोलिसांच्या ताब्यात

चोरीच्या इराद्याने प्रवास; निफाड बसस्थानकात कारवाई

निफाड ः विशेष प्रतिनिधी
येवला ते नाशिक बसमधून पाच ते सहा संशयित महिला (वय अंदाजे 35 ते 40) आपल्या लहान बाळांना सोबत घेऊन चोरीच्या उद्देशाने निफाडकडे येत असल्याची खबर्‍यामार्फत निफाड पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी निफाड बसस्थानकात सापळा लावला.
नाशिकला जाणारी बस शनिवारी (दि. 7) सकाळी अकराच्या सुमारास निफाड बसस्थानकात आली. बसमधील संशयित महिलांची कसून चौकशी केली. महिलांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संबंधित महिला निफाड पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या. संशयित महिलांनी 24 मे रोजी नाशिक ते छत्रपती संभाजीनगर बसने प्रवास करत असताना औरंगाबाद नाका ते चांदोरी चौफुलीदरम्यान दुपारी 2 ते 3 च्या सुमारास येवला येथील फिर्यादी महिलेच्या बॅगमधून सोन्याचे गंठण, पोत असे अंदाजे 60 हजारांचे सोने लंपास केले होते. याबाबत सायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. संशयित महिलांनी मालेगाव ते अहिल्यानगर प्रवासादरम्यान 19 एप्रिलला सावरगाव शिवार (ता.येवला) येथे एक लाख 50 हजारांची तीन तोळे सोन्याची पोत व दहा हजारांचे दहा भार चांदीच्या ब्रेसलेटची चोरी केली होती. या घटनेची नोंद येवला शहर पोलिस ठाण्यात झाली होती. सायखेडा व येवला येथील या फिर्यादी महिलांना निफाड पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. फिर्यादी महिलांनी संशयित महिलांना ओळखले. याच महिलांनी सोन्याची चोरी केल्याची कबुली दिली. त्यांचा जबाब नोंदवून कारवाईसाठी सायखेडा व येवला पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. कारवाईत पोलिस कपालेश्वर ढिकले, नितीन साळवे, धनंजय जाधव, नितीन सांगळे, संगीता जाधव, पूनम शिंदे, राजेंद्र दरोडे यांनी सहभाग घेतला.

कोणत्याही प्रवासादरम्यान सावध राहूनच प्रवास करायला हवा. आपले मौल्यवान दागिने प्रवासात घालणे टाळावे. प्रवासात आपल्या मागे व पुढे, शेजारी कोण बसलेले आहे, याचा अंदाज घ्यावा. गर्दीच्या ठिकाणी नागरिक व महिलांनी मोबाईल, पैशाच्या पाकिटाची काळजी घेतली पाहिजे. जर कुणाला एखाद्या व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली वाटल्या तर 112 या नंबरवर फोन करून माहिती दिली पाहिजे किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क केला पाहिजे.
– गणेश गुरव, पोलिस निरीक्षक, निफाड पोलिस ठाणे

 

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago