चांगल्या समाजाच्या निर्मितीत महिलांचे योगदान मोठे

खा. डॉ. शोभा बच्छाव : दै. गांवकरी नवरंगोत्सव बक्षीस वितरण

नाशिक : प्रतिनिधी
महिलांमध्ये उपजतच कलागुण असतात. त्यामुळे महिला सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने स्वत:ला सिद्ध करत आहेत. चांगल्या प्रकारच्या समाजाची निर्मिती व्हावी आणि महिलांना समाजात सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, यासाठी महिलांनी राजकारणात यायला हवे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे महिलांनी राजकीय क्षेत्रदेखील पादाक्रांत करायला हवे, असे प्रतिपादन धुळे मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी येथे शुक्रवारी (दि. 10) केले.
नवरात्रोत्सवानिमित्त दैनिक ’गांवकरी’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या नवरंगोत्सवातील 36 भाग्यवान महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दै. गांवकरी, मेहंदी साडी पॅलेस, भगूरकर सराफ, बॉलीवूड मेकओव्हर, वायटॅलिस होमिओपॅथिक क्लिनिक व लायन्स क्लब पंचवटी यांच्या विशेष सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवारी (दि. 10) लायन्स क्लब हॉल येथे पार पडले.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून खा. डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेस महिला शहराध्यक्ष स्वाती जाधव, सावानाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, लायन्स क्लब पंचवटीचे अध्यक्ष मकरंद सोमण, मेहंदी साडीचे संचालक अतिश शाह व समीर शाह, बॉलीवूड मेकओव्हरच्या ग्रीष्मा लोखंडवाला, वायटॅलिस होमिओपॅथिक क्लिनिकच्या डॉ. श्रेया राठी, जयश्री राठी, अरविंद राठी, ’गांवकरी’चे वृत्तसंपादक भागवत उदावंत, उपसंपादक गोरख काळे, उपसंपादक राजेंद्र खुळे, वाहिद बागवान, नयना बारिया आदी उपस्थित होते.
खा. डॉ. बच्छाव पुढे म्हणाल्या, की ’गांवकरी’ने नवरंगोत्सवाचा उपक्रम राबवत महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ही स्वागतार्ह बाब असून, उद्योजिकांसाठी उपक्रम राबवत महिलांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
यावेळी काँग्रेस महिला शहराध्यक्ष स्वाती जाधव म्हणाल्या की, दै. गांवकरीतर्फे आयोजित नवरंगोत्सवात सहभागी झालेल्या सर्व महिलांचे अभिनंदन करते. स्पर्धा म्हटले की यश-अपयश आलेच. पण सहभागी होणे महत्त्वााचे आहे. गांवकरीने महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हा स्तुत्य उपक्रम आहे. महिलांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्पर्धेत सहभागी होणे किंवा जिथे संधी असेल तिथे अंगी असलेल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. डॉ. श्रेया राठी म्हणाल्या की, महिला या कुटुंबाची काळजी घेत असताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
महिलांचे आरोग्य चांगले असेल तरच कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. उपसंपादक देवयानी सोनार यांनी प्रास्ताविक केले. उपसंपादक अश्विनी पांडे यांनी सूत्रसंचालन केले. उपसंपादक मुकुंद बाविस्कर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाधान रोकडे, संदीप भांगरे यांनी प्रयत्न केले.

दैनिक ’गांवकरी’ने नवरात्रानिमित्त आम्हा महिलांसाठी अतिशय सुंदर असे कार्यक्रम आयोजित केले. एक नवचैतन्य आमच्या महिलांमध्ये या रंगोत्सव कार्यक्रमामुळे निर्माण झाले. त्यासाठी आयोजकांचे आभार. यापुढेदेखील महिलांसाठी कार्यक्रम घेत महिलांना प्रोत्साहन द्यावे.   – वैशाली चव्हाण, नाशिक

दै. ’गांवकरी’ने महिलांना दिलेल्या व्यासपीठाबद्दल धन्यवाद. महिलांना अशा उपक्रमातून प्रोत्साहन मिळत असते. इतर ठिकाणी स्पर्धेत सहभागी व्हायचे म्हटल्यास सहभागाबद्दल नोंदणी शुल्क वगैरे घेतले जाते. पण गांवकरीने महिलांना नवरंगोत्सवात सहभागी करून घेत व्यासपीठ तर दिलेच, पण बक्षीस देत कौतुकाची थाप दिली. – नेहा जोशी (बक्षीसप्राप्त नवदुर्गा)

मेहंदी साडी पॅलेसचे अतिश शाह म्हणाले, की दै. गांवकरीने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक आहे. महिलांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मेहंदी साडी पॅलेसच्या वतीने
दिवाळीत महिलांसाठी विशेष ऑफर्स देण्यात आल्या आहेत. या ऑफर्सचा महिलांनी लाभ घेण्यासाठी दुकानाला भेट द्यावी.

या नवदुर्गांचा झाला सन्मान

पांढरा रंग

 सारिका जाधव
विद्या शिरसाठ
अर्चना डुंबरे
दीपाली ताळपे

लाल रंग

प्राजक्ता परळकर
वैशाली चव्हाण
सुनीता बाविस्कर
वंदना अहिरे डीजीपी नगर

निळा  रंग

पुष्पा वाघ, नाशिकरोड
दक्षता कुटे, बेलत गव्हाण
रागिणी साळवे
स्नेहल कुलकर्णी

पिवळा रंग

वर्षा बडवर
नेहा जोशी
जयश्री अडसरे
वैशाली जवळकर

हिरवा रंग

शिल्पा झरेकर
कुसुम कोठावदे धुळे

नेहा क्षत्रिय
सृष्टी सुराणा

राखाडी रंग

निर्मला कलबुर्गी
सोनाली दहिवाड शिर्डी
आरती संधान कुरणोली
मीनल बुब

केशरी  रंग

मेघा चव्हाण
स्नेहल भंदुरे
शीतल अष्टेकर
जयश्री परदेशी

मोरपंखी  रंग

सुजाता जंजाळकर
मीना बारिया
हंसा चव्हाण
पौर्णिमा काबरा

गुलाबी रंग

प्रियांका पाटील, खेरवाडी
सुनीता त्रिभुवन
ज्योती व्यहवारे
योगिता काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *