नाशिक : प्रतिनिधी
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार नाशिक शहरातील द्वारका सर्कल येथील सतत होणार्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कल काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा नाशिकमधील अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांत जास्त वर्दळ असणारा चौक असल्याने येथे होणार्या वाहतूक कोंडीचा नाशिककरांना खूप त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
तसेच येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्यात यावी, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ नाशिक महानगरपालिका, नाशिक शहर वाहतूक पोलिस व राष्ट्रीय महामार्ग विभागाला केलेल्या होत्या व यासाठी बैठक घेतलेली होती तसेच पत्रव्यवहारही केलेला होता. त्यांच्या या पाठपुराव्यातून अखेर हे काम सुरू झाले असून, लवकरच या ठिकाणी एक सुनियोजित वाहतूक व्यवस्था उभारण्यात येऊन वाहतूक कोंडीमधून नाशिककरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…
नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…
श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…