नाशिक : प्रतिनिधी
नाशिक रेड क्रॉस आणि श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा शालेय गट व 11 वी च्या पुढे खुला गट अशा दोन गटात होईल. यंदाच्या आपली पृथ्वी आपले आरोग्य अर्थात आपली हवा, पाणी व अन्न स्वच्छ ठेवा किंवा आरोग्याशी संबंधित कोणतेही पैलू दाखवणारे पोस्टर माउंटबोर्ड वर रेखाटून पाठवायचे आहे. किमान आकार 15 इंच बाय 20 इंच असावा.
स्पर्धेत सहभागी सर्वांना ई प्रमाणपत्रे देण्यात येणार असून विजेत्यांना अत्यंत आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येतील. आपली पोस्टर्स सोमवार दि.4 एप्रिल पर्यंत पोस्टाने, कुरियरने ,समक्ष पुढील पत्त्यावर पोहोचायला हवीत.- इंडियन रेड क्रॉस सोसायटी, रेड क्रॉस हॉल, टिळक पथ, नाशिक – 422001.
पाठवण्यापूर्वी पोस्टर चा मोबाईल वर फोटो काढून 9422248380 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारा पाठवावा.
स्पर्धेच्या व विषयाच्या अधिक माहितीसाठी 9422248380 या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन रेडक्रॉस सचिव मेजर पी.एम. भगत , श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ.पल्लवी धर्माधिकारी , स्पर्धा संयोजिका डॉ. प्रतिभा औंधकर , ईपका लॅबोरेटरीज तसेच रेडक्रॉस कार्यकारिणी ने केले आहे.
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…