पतीने केले असे भयानक कृत्य
येवला प्रतिनिधी
शहरातील मालेगाव रोड भागात पतीने केलेल्या भयानक कृत्यामुळे संपूर्ण येवला शहर हादरले आहे कौटुंबिक वादातून पती ने पत्नी वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली यात पत्नी गंभीर जखमी झाली असून पतीचा मात्र जागीच मृत्यू झाला
पाटबंधारे विभागात कॅनाल निरीक्षक असलेल्या किरण दुकळे यांनी आपली पत्नी वैशालीवर गोळी झाडून नंतर स्वतःही गोळी झाडून आत्महत्या केली वैशाली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेने संपूर्ण येवला शहर हादरले असून अधिक तपास पोलीस करत आहेत