नाशिक : वार्ताहर
मुलींना मोबाईल का दाखवतो, येथून निघून जा असे सांगितल्याचा राग मनात धरून गुरुवारी (दि १४). रोजी रात्री 01.30 ते 01.45 दरम्यान उत्कर्ष नगर नाशिक येथील त्रंबक रोड लगत संशयित गौरव सुहास जाधव याने धारदार चाकूने रमेश नारायण ताटे याच्यावर वार केले. हातास , छातीवर वार करून जीवे ठार केले. याप्रकरणी गंगापूर पोलीसात मनीष काशिनाथ रूपवते, (वय ४४ व्यवसाय कलेक्शन एजन्सी, राहणार परदेशी यांच्या लॉन्ड्री शेजारी, उत्कर्ष नगर त्रंबक रोड नाशिक यांनी फिर्याद दिली . गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी गौरव सुहास जाधव यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास गंगापूर पोलिस करत आहेत.