येवला : प्रतिनिधी
येवला शहरासह तालुक्यात गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळामुळे शहरातील नागडदरवाजा भागातील झाडांच्या फांंद्या तुटल्या, तसेच शहरातील प्रत्येक भागात पाणी साचले. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. वार्यामुळे संपूर्ण तालुक्याला व पूर्व भागाला झोडपून काढले. निसर्गाच्या कोपामुळे शहर व ग्रामीण भागात नुकसान झाले.
शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. वार्याचा वेग इतका प्रचंड होता की, शहर आणि परिसरातील अनेक मुख्य रस्त्यांवर झाडांच्या मोठ्या फांद्या मोडून पडल्या. काही ठिकाणी किरकोळ पडझडही झाली आहे. या वादळाचा थेट फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला. अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने आणि वीजखांब हलल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहर व परिसराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका फळबाग उत्पादक शेतकर्यांना बसला आहे. सध्या आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, झाडांना लागलेले आंबे काढणीला आले होते. मात्र, गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळामुळे आंबा पिकाची मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली आहे. झाडांचे आंबे जमिनीवर पडून
फुटल्याने शेतकर्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. दरम्यान, उन्हाच्या तीव्रतेेेने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.
Yeovil lashed by storm and rain
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…