आजाराच्या भीतीने कल वाढला मात्र, सातत्याचा अभाव
नाशिक ः देवयानी सोनार
बदलती जीवनशैली, ताणतणावाबरोबरच वाढत्या वयात महिलांना आता आजाराची भीती सतावू लागली आहे. वाढत्या वयासोबत येणार्या आजारांपासून दूर राहण्यासाठी योगासने, चालणे, जिमला जाण्याकडे कल वाढला आहे.वजन कमी, सुडौल शरीर, चेहर्यावर चमक हवी यासाठी आग्रह केला जातो. परंतु यात सातत्य राहत नसल्याचा योगतज्ज्ञांचा दावा आहे. परिणामी महिना-दोन महिन्यांत योगा क्लासेस बंद होतात, असे चित्र आहे.
महिलांमध्ये योगा करण्याची क्रेझ गेल्या काही वर्षांत वाढली आहे. सुडौल दिसण्यासाठी जिम, योगा लावण्याकडे मुली, तरुणींचा कल दिसून येतो. गृहिणी, नोकरदार महिलांना वाढत्या वयात लठ्ठपणा, केसगळती, रक्तदाब, मधुमेह, मोनोपॉजमुळे सतत होणारे मूड स्विंग अशा अनेक आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. असे आजार होऊ नयेत किंवा त्यांची तीव्रता कमी असावी यासाठी महिला सजग आता होत आहेत. चालणे, पळणे, तसेच योगा क्लासेस लावतात, पण काही कारणामुळे सातत्य राहत नाही. त्यामुळे कधी महिना, तीन महिने किंवा वर्षभराचे पैसे भरून वाया जातात. नियमित योगा केला जात नाही, हे वास्तव आहे. आरोग्यासाठी योगाची गरज आहे. पैसा, घर, संपत्ती सर्वकाही विकत घेता येते; परंतु आरोग्य आपले आपल्यालाच निरोगी ठेवावे लागते. जेव्हा गंभीर आजार होतो तेव्हा आरोग्याचे महत्त्व कळते. तेव्हा कोणता आजार होण्याची वाट न पाहता योगासने, व्यायामाला वेळ दिला पाहिजे, आजाराच्या भीतीमुळे नाही, तर आरोग्यासाठी सजग होण्याची वेळ आली आहे. असे योगतज्ज्ञ सांगतात.
महिलांना तणावपूर्ण जीवनशैली, घर, नोकरी, मुले, नातेसंबध, सणवार सगळीकडे सहभागी होऊन सर्व पार पाडावे लागते. मुले मोठी झाली, कामातून मोकळा वेळ मिळू लागला की, मैत्रिणींचे विविध ग्रुप, सोशल मीडिया ग्रुपमुळे एकत्रित छंदवर्ग किंवा व्यायामाप्रति सजग होत हास्यक्लब, मॉर्निंग वॉक, योगा आदींद्वारे शरीराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली जाते. काही दिवस नियमित सर्व सुरू असते; परंतु काही काळानंतर अनेक कारणांमुळे सातत्य राहत नाही.
योगा हा केवळ शरीराची हालचाल नाही, तर तो शांत, संतुलित आणि आनंदमय जीवनाकडे नेणारा मार्ग आहे. यामध्ये सातत्याचा अभाव चुकीचा आहे. प्रत्येकाने वेळ द्यायला हवा.
– सोफिया कपाडिया, योगशिक्षिकामहिलांचे प्रमाण त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे कधीकधी कमी असते. महिन्याच्या चार दिवसांत योगा करत नाहीत. घरात काही अडचण असेल, आजारपण असेल, गावाला जायचे असेल, अशा वेळेस योगाला येत नाहीत. ज्यांना आजार आहे, काही त्रास आहे, अशांनी योगाला सुरुवात केली की, त्या वेळ काढण्याचा जास्त प्रयत्न करतात. काही महिला योगा करण्यास टाळाटाळ करतात.
-चारुशीला गोरवाडकर, योगशिक्षिकायोगा नियमित करणार्यांची संख्या कमी आहे; परंतु स्वतःविषयी जागरूकता आणि वाढणार्या वयासोबत आजारांची भीती यामुळे का होईना महिला योगाकडे वळू लागल्या आहेत. पण त्यात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.
– नीता निकम, योगशिक्षिका
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…