वयाच्या बंधनांपलीकडे जाऊन योग करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन
कोलकाता : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 21) येथील ऐतिहासिक ’रेड रोड’वर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य राष्ट्रीय कार्यक्रमाचे नेतृत्व केले. याप्रसंगी देशाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तो ’मानवी आत्म्याचा आविष्कार’ आहे. तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, योगासने केवळ एका विशिष्ट वयोगटापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवली पाहिजेत. 21 जून हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस. आता योगामुळे जगातील सर्वांत मोठा सामूहिक उत्सव बनला आहे. याने देश, संस्कृती आणि समुदायांना एकत्र आणण्याचे काम केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन ’योगा फॉर हेल्दी एजिंग’ (सुदृढ वृद्धत्वासाठी योग) या संकल्पनेवर साजरा करण्यात आला. या थीमचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, वाढते वय हे माणसाची क्षमता, उत्पादकता किंवा समाजातील योगदान कमी करणारे ठरू नये यासाठी समाजाने प्रयत्न केले पाहिजेत. ते पुढे म्हणाले, की आपले ध्येय हे असले पाहिजे की आपण वयाच्या 20 व्या वर्षापेक्षा 40 व्या वर्षी अधिक लवचिक असावे आणि 30 व्या प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासात अत्यंत कमी कालावधीत आणि कोणत्याही विरोधाशिवाय मंजूर झालेल्या प्रस्तावांपैकी हा एक महत्त्वाचा प्रस्ताव ठरला. आज भारताच्या पुढाकारामुळे जगभर योगाचा प्रसार झाला असून, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. कार्यक्रमादरम्यान शिवप्रकाश यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने योगशिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.
Yoga is the ‘manifestation of the human soul’.