उंगली पकड के तुने चलना सिखाया था ना
पितृदिनाचे सोशल मिडीयावर सेलिब्रेशन
नाशिक : प्रतिनिधी: “माझ्या छोट्या-छोट्या इच्छांवर तुम्ही जीव ओवाळून टाकता परमात्याचे दुसरे रूप आहेत बाबा”…, “बाबांमुळे आहे माझी ओळख तुम्ही माझ्यासाठी काय आहात, हे कसे सांगू माझे वडीलच म्हणजे माझ्यासाठी आहेत आभाळ” ,वडिलांसाठी आपण काय स्टेटस ठेवणार ,वडिलांमुळेच आज आपल स्टेटस आहे.असे शुभेच्छा संदेश देत पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सण, उत्सव असो वा जयंती पुण्य तिथी असो सोशल मीडियावर त्याचा उत्साह दिसतो. पितृदिनाचा सोशल मीडीयावर उत्साह दिसत होता. असे नाते जे दिसत नसले तरी त्याचे ॠणानुबंध अधिक घट्ट असतात ते म्हणजे मुलगा किंवा मुलींचे वडिलांसोबत असलेले नाते. ! या नात्यात संवाद कमी असला तरी जिव्हाळा अधिक घट्ट असतो. वडिलांविषयी आपल्या भावना पितृ दिनाच्या दिनाच्या निमित्ताने सोशल माध्यमातून व्यक्त करण्यात आल्या. आई विषयीच्या भावना अनेक वेळा व्यक्त करण्यात येतात पण वडिलांविषयी असलेले प्रेम ,आपुलकी मात्र कधी शब्दातून व्यक्त होत नाही. त्यामुळेच पितृदिनाचे औचित्य साधत त्यांच्या प्रतीचे ॠण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले. विवाहित मुली आणि महिलांना आपल्याला वडिलांना प्रत्यक्ष भेटून पितृदिनाच्या शुभेच्छा देता आल्या नाहीत.त्यांनी मेसेज, काॅल्स, व्हिडिओ काॅलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तसेच पितृदिनाच्या निमीत्ताने विशेष अशी भेटवस्तू वडिलांना देत त्यांच्याप्रतीचे प्रेम ,आदर व्यक्त करण्यात आले. तर अनेकांनी केक कट करत, भेटवस्तू देत पितृदिन साजरा केला. मध्यरात्रीपासूनच युजरकडून सोशल मिडीयावर वडिलांसोबतचे फोटोज पोस्ट करण्यात आले होते. व्हाटसॅप अॅप ,फेस बुक, इन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर पितृदिनाचा उत्साह होता. तर फक्त एक दिवस वडिलांचा नसतो तर प्रत्येक दिवसच वडिलांचा असतो असाही सुर सोशल मीडियावर उमटत होता. तर ज्यांनी आपल्या वडिलांना गमावले आहे त्यांनी पितृदिनाच्या निमीत्ताने वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.
आयुष्यात आई आणि वडिल हे दोन्ही आधारस्तंभ आहेत.दोघांपैकी एकही आधारस्तंभ गमावला तर आयुष्यात अंधकार असतो. त्यामुळे प्रत्येकानेच आई वडिल असताना त्यांचा आदर करायला हवा. पितृछत्र हरपल्यानंतरच वडिलांचे महत्त्व क्षणोक्षणी जाणवते. वडिल हे सूर्यासारखे असतात. सतत सोबत नसले तरी त्यांच्या अस्तित्वाने आयुष्य प्रकाशमय होते.
शिवानी पुंडे
वडिलांना पितृदिनाच्या शुभेच्छा देण्याइतपत माझी पात्रता नाही. पण तुम्ही आहात म्हणून कोणतही संकट आमच्या पर्यंत येऊ शकत नाही याची जाणीव मनात कायम असते. एक दिवस स्टेटस ठेवत वडिलांचा शुभेच्छा देण्यापेक्षा कायम त्यांच्या आदर केला तर याच त्यांच्यासाठी पितृदिनाच्या शुभेच्छा असतील.
राधिका गांगुर्डे