सिन्नर : वार्ताहर दोन दिवसांपासून सिन्नर तालुक्यात वाव परिसरात तसेच नांदूरशिंगोटे परिसरात पावसाने जोरदाम हजेरी लावल्याने शेतात पाण असल्याचे दृश्य निर्माण झाले होते . अशातच बुधवारी दुपारी सगळीकडे विजांचा कडकडाट सुरू असताना बुधवारी ( दि . २२ ) दुपारी ३.४५ वाजत एका तरुणाच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्य झाला . रवीद्र आनंदा पवार ( २१ , रा . शिवडे ) असे मृत तरुणाचे नाव आहे . रवींद्र हा आपल्या शेळ्या घेऊन परिसरात चारण्यासाठी फिरत होता . दुपारी ३.३० च्या दरम्यान शिवडे परिसरात अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली . यावेळी रवींद्र गावातील जनता विद्यालयाच्या पाठीमागील जागेव शेळ्या चारत होता . पाऊस सुरू झाल्याने तो जवळच असलेल्या एका झाडाखाली लपला . मात्र , त्याच वेळी झाडावर वीज पडल्याने रवींद्रला जोरदार झटक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला . ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी जात त्याला गावातील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले . मात्र , डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले . रवींद्रचा मृत्यू झाल्याचे समजताच गावावर शोककळा पसरली होती . यानंत सिन्नर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला .
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…