नाशिक

युवती आणि करियरची निवड!

 

उत्तम शिक्षण घेण्याबरोबरच अर्थार्जनासाठीदेखील स्वतःस सक्षम करणे हो आजच्या खांची गरज आहे. तिने करिअर निवडताना काय करावे, याचा विचार करूयात महिलांनी करिअरची निवड करताना प्रामुख्याने पुढील मुद्दे विचारात घ्यायला हवेत. करिअर कसे असावे, पहिला पर्याय मी जे काम करते ते मला आवडते. दुसरा पर्याय मला आवडते ते काम मी करते. यामध्ये दुसरा पर्याय करिअर म्हणून असावा असे वाटते. हे सूत्र धरले तर करिअरची निवड करताना तीन गोष्टींचा विचार केला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे, जे मला आवडते आणि जे मला करायला जमते, त्याची समाजाला गरज आहे का?
आपल्याला काय आवडते याची आधी एक यादी करा. त्यात बन्याच गोष्टीचा अंतर्भाव होईल. उदा. मला गणित, विज्ञान आवडते, फुटबॉल खेळायला आवडते, तबला ऐकायला आवडतो, चित्र काढायला आवडतात, ट्रेकिंगला जायला आवडते, स्वयंपाक करायला आवडते वगैरे करिअरची निवड करताना आपल्या अंगभूत क्षमतांचा विचार करून त्या क्षमतांशी सुसंगत करिअरची निवड करणे योग्य ठरते. आपल्या क्षमतांचा विचार करताना मानसशास्त्रानुसार नक प्रकारच्या क्षमता (बुद्धिमत्ता) असतात हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

१) *भाषिक बुद्धिमत्ता* :भाषा, साहित्य, कविता इत्यादी क्षेत्रात अधिक गती असते.
२) *गणित बुद्धिमत्ता* : गणित विषयात अधिक ती असते.
३) *सांगीतिक बुद्धिमत्ता*: संगीत, गायन, वाद्यवादन, याविषयी अधिक गती असते.
४) *नैसर्गिक बुद्धिमत्ता*: दिशा, प्रदेश, भौगोलिक, परिस्थिती, प्राणी, पक्षी अशा विषयांत अधिक गती असते.
५) *आध्यात्मिक बुद्धिमत्ता*: आध्यात्मिक क्षेत्राची आवड, मनन, चिंतन, साधना अशा विषयात गती असते.
६) *कारक बुद्धिमत्ता* : हस्तकौशल्य, कलाकुसर, मैदानी खेळ अशा विषयांत अधिक गती असते.
७) *आंतर-वैयक्तिक बुद्धिमत्ता*: मोकळा स्वभाव संवादकौशल्य, ज्याला इंग्रजीमध्ये extrovert म्हणतात. (असा स्वभाव असणारे मार्केटिंग क्षेत्रात प्राध्यापक शिक्षक या क्षेत्रात अधिक यशस्वी होण्याची शक्यता असते.)
८) *आंतर-वैयक्तिक बुद्धिमत्ता*: अबोल, संवाद- कौशल्ये नसलेला (introvert) एकटयाने एकाग्रपणे करायची कामे, संशोधन या क्षेत्रात यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.
९) *दृक-श्राव्य बुद्धिमत्ता*: जो कल्पनेने आकारमान, वस्तुमानाचा अंदाज करू शकतो, उदा. एखादा आर्किटेक्ट इमारतीचे डिझाईन करण्यापूर्वी कल्पनेने तो इमारत आधी पाहतो, मग कागदावर उतरवतो मग प्रत्यक्षात उभी करतो, अशा प्रकारची कल्पनाशक्ती या क्षमतांपैकी आपल्याकडे कोणती क्षमता कमी-अधिक आहे त्याचा अंदाज यावा.
आपल्या मर्यादांचाही विचार केला पाहिजे. यात सामान्यपणे बौद्धिक, शारीरिक, आर्थिक, पारिवारिक मर्यादांचा विचार केला पाहिजे. उगाचच बहुतांश विद्यार्थी इंजिनिअरिंग मेडिकल शाखेकडे जातात, म्हणून आपण जाण्याचा विचार करने योग्य नाही आपली बौद्धिक क्षमता नसेल तर करिअरचा दुसरा चांगला मार्ग निवडता येऊ शकतो.
करिअरसाठी क्षेत्र निवडताना आपल्या आवडीचाही विचार करावा. सध्या टी.व्ही., इंटरनेट, सोशल मिडियाच्या जमान्यात कलेचे करिअर करण्याच्या खूप संधी उपलब्ध आहेत. आपल्याकडे जी कोणती कला असेल त्यात प्रावीण्य मिळवून कलेच्या क्षेत्रात चांगले नाव कमावता येते. परंतु कलेचे करिअर करण्याचा मार्ग तुलनेने सोपा आहे असे समजू नका, त्याही मार्गात खूप स्पर्धा असल्याने आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी खूप अभ्यास आणि कष्ट करावे लागणार आहेत.

यासाठी असलेले मुबलक पर्याय खालील प्रमाणे:-

कष्ट करून आपले भविष्य घडविण्याची उमेद असलेल्यासर्व स्तरांतील मुलीसाठी दहावी आणि बारावीनंतर शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. यात पारंपरिक शिक्षणाबरोबरच मर्यादित कालावधीचे व खात्रीलायक व्यावसायिक संधी मिळवून देणारे अनेक पर्याय चोखाळता येऊ शकतात. यात महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन प्रमाणित विविध पदविका अभ्यासक्रम आहेत. याशिवाय ब्यूटी कल्चर, कॉस्च्युम डिझायनिंग, वेब मार्केटिंग डेव्हलपर, पंजाबी ड्रेस मेकिंग, फूड प्रोसेसिंग आणि बेकरी, ज्वेलरी मेकिंग, मेहंदी कोर्स, मसाला मेकिंग, एम. एस. ऑफिस, पिकल मेकिंग, पेपर बैग मेकिंग, आईस क्रीम मेकिंग, चॉकलेट मेकिंग, पंजाबी फूड मेकिंग असे एक वर्षापासून ते अवच्या तीन दिवसांपर्यंतचा कालावधी असलेले व्यावसायिक संधी देणारे आणि मुख्य म्हणजे कुणालाही सहज परवढू शकतील असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत
“परदेशी भाषा” या क्षेत्रांतही करीअरच्या उत्तम संधी आहेत. जर्मन, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन अशा विविध परदेशी भाषा शिकण्यासाठीचे असेच मर्यादित कालावधीचे आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध असतात, त्याद्वारे या क्षेत्रात प्रवेश मिळवता येऊ शकतो. याबरोबरच समुपदेशन हीदेखील या काळामध्ये सर्व क्षेत्रांची गरज बनलेली आहे. चाइल्ड काउन्सेलिंग, मैरेज काउन्सेलिंग अशा विषयावरील छोट्या कालावधीचे कोर्सेस यासाठी निवडता येऊ शकतात, याव्यतिरिक्त अनेक छोटी-मोठी कार्यालयीन कौशल्ये, संवाद कौशल्ये, लेखन कौशल्ये आदी आत्मसात करून त्या आधारवरही आपला भविष्याचा मार्ग प्रशस्त करता येऊ शकतो.
– मृणाल पाटील
नाशिक

Ashvini Pande

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

6 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

6 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

15 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

1 day ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago