– प्रणाली देशमुख
आठवतो का रे…? तुझ्या-माझ्या भेटीचा तो पहिला-वहिला पाऊस! अनवाणी, चिखलाचे कितीतरी मैल तुडवत असताना, कधी चुकून घसरायला झालं, की अलगद तू सावरायचास- मी आहे ना! म्हणत…
तुझं सावरणं आणि माझं आवरणं, हे सगळं कठीण वाटत असलं तरी, कोणतीही पाऊलखुण मागे न ठेवता, फक्त मनमुराद भिजायचं- हे तूच तर शिकवलंस ना!
चिखलात पावलं ठसे उमटवतात, तितक्याच सहज, सरी येऊन गोंधळ घालणार्या अल्लड मुलीसारख्या, मांडलेला सगळा पसारा विस्कटून निघून जातात.
निरागस असतात ना, पावसाच्या त्या सरी! तुझी जुनी बाईक, तुझा तो वेडा हट्ट… एका हाताने हॅण्डल सांभाळत, दुसरा हात माझ्या हाती देऊन, वार्यासारखा तू बेछूट हवेत असायचास.
अरे, निदान स्टॅन्ड तरी काढ! मुलुखाचा विसरभोळा तू! कितीतरी वेळा बंद पडणारी बाईक बघून तू म्हणायचास,
आयला, तुला बघून कॉम्प्लेक्स येतो तिला, तुझ्या आधी आली गं ती… इतना हक तो बनता है! तुझ्या-माझ्या प्रेमाला गालबोट लागू नये म्हणून, मऊशार ढगांनी अख्खा आसमंत काजळी-काजळी व्हायचा. लख्ख चमकून जाणार्या विजेच्या अग्नीला साक्षी मानून, कितीतरी वेळा आपण सप्तपदी चाललोय…
तुझ्या डोळ्यांत दिसणारं वादळ, मी गोडीगुलाबीने कित्येकदा परतून लावलं.
शेवटी, पाऊस बनून आलास आणि देहाच्या जमिनीवर साखरपेरणी करून निघून गेलास, कायमचा… ढगात! आणि तुझ्या प्रेमाची खूण माझ्या उदरात वाढू लागली.
तू माझ्यात पेरलेला तो पाऊस आज यौवनात आलाय, गॅरेजमधून तुझी जुनी बाईक काढताना त्याला बघितल्यावर, मला राहवलं नाही.
बघ ना, सगळे म्हणतात पावसाळा फक्त चार महिने असतो; पण तू गेल्यापासून, मी मात्र अविरत भिजतेय तुझ्या आठवणीत…
Your Rain
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…