– आशा नवले
खरेतर शहरात आता बघायला न मिळणारा… खेड्यात कालबाह्य होत जाणारा….हौद… शेतकरी आणि बैल एक अतूट नाते होते. जेव्हा शेती हाच व्यवसाय होता. अगदी जेव्हा विहिरीवर मोटा चालायच्या तेव्हा प्रत्येक विहिरीवर एक हौद असायचा. तेव्हा तो दगडाने बांधलेला आणि चुना घालून पक्का केलेला असायचा. मोट वर आल्यावर आधी त्यात उपडी व्हायची नंतर त्याच हौदातून दंड पाडून पाणी शेतीला पाठवले जायचे. दिवसभर माणसांना आणि शेतात राबणार्‍या बैला साठी त्या हौदात पाणी असायचे.काळ बदलला आणि विहिरीवर विजेवर चालणारी मोटर (पंप) बसवले जाऊ लागले. पंप चालू झाल्यावर दिवसभराचे पाणी काही तासांत उपसले जाऊ लागले.विहिरीतून पाणी बाहेर टाकणारा पंप व्यवस्थित राहावा म्हणून आणि पाण्याचा वेग रोखला जावा म्हणून हौद बांधला जाऊ लागला. जो पूर्णतः विटा आणि सिमेंटचा पक्का बांधलेला असे. पंप बंद झाला तरी त्यात भरपूर पाणी राहायचे.
एकदा पंप चालू झाल्यावर विहिरी मधील स्वच्छ पाण्याने भरून तो वाहायला लागला की भारी वाटायचा. जर एखाद्याची विहीर गावा शेजारी असेल तर त्यावर सकाळी सकाळी बाईमाणसांची गर्दी व्हायची.कोणाला पाणी न्यायचे असायचे, तर कोणाला धुनी धुवायची असायची. लहान मुलांना त्यात डुबायला आवडायचे. विहिरीतील त्या स्वच्छ आणि थंडगार पाण्याचा स्पर्श खूप वेगळाच असायचा.
त्या हौदाने रोज अशी माणसांची किलबिल ऐकलेली असायची. मुलांचा आरडाओरडा ऐकलेला असायचा. कोणा सासुरवाशीणचे हुंदके ऐकलेले असायचे.तिच्या डोळ्यातील पाणी स्वतःमधून सामावून ते प्रवाहित केले असायचे. तहानेने व्याकूळ झालेल्या गाई, बैलांची तहान भागवली असायची. त्यांच्या गळ्यातील घुंगराचा आवाज ऐकलेला असायचा. कोणच्या तरी एकटेपणात त्याच्यात पाय सोडून बसलेल्या व्यक्तीच्या पायाला आपल्या स्पर्शने साथ दिलेली असायची.
भरलेला हौद त्यातून वाहणारे पाणी …ते खाली दंडात पडताना होणारा त्याचा आवाज….उगाच त्यात हात घालून त्या पाण्याशी केलेला चाळा… आजूबाजूला डोलणारी पिके. सगळे कसे उल्हसित करणारे.
गाव सोडले शहरे जवळ केली. मनातून जात नाही ते गाव. मग उगाच कुठे तरी मुलांना घेऊन रिसॉर्टवर जायचे. क्लोरिन घातलेल्या आणि साठवून ठेवलेल्या त्या पाण्यात उड्या मारायच्या. मुलाकडे बघून खूश व्हायचे. मनाने मात्र आज स्वतःचे अस्तित्व नसलेल्या त्या विहिरीवर त्या हौदापाशी जाऊन यायचे.खिशात पाच पैसे नसताना केलेली ती मजा आठवायची. पुन्हा आपल्या कामाला लागायचे.
आजही शेतात तो हौद आहे. पाणी नसलेली विहीर आहे. शेत करायला कोणी नाही म्हणून ओसाड पडून आहे. आता ठिबकद्वारे पाणी शेताला दिले जाते. विहिरीऐवजी बोअरवेल घेतले जातात.
काळ बदलला आहे, बदलत आहे.कुठला तरी एखादा हौद गतकाळाची आठवण मात्र देत असतो.

Water tank

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

23 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

23 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

24 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

24 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

24 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

24 hours ago