नाशिक

सातपूरमध्ये तरुणावर कोयता, रॉडने हल्ला

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सिडको : प्रतिनिधी
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित दांडिया कार्यक्रमात नाचण्यावरून झालेल्या वादातून 28 वर्षीय तरुणाला तलवार, कोयता आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सातपूरमधील प्रबुद्धनगर येथे घडली.
याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दहा संशयितांसह अन्य चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शुभम नाना पानपाटील (वय 28) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याची आई प्रतिभा नाना पानपाटील (वय 45, रा. पिंपळ चौक, प्रबुद्धनगर, सातपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान सातपूरमधील आंबेडकर चौकात नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया खेळण्याचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात काही तरुणी विचित्र पद्धतीने नाचत असल्याच्या कारणावरून त्यांना हटकल्याने वाद निर्माण झाला. त्यातून संशयितांनी कुरापत काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, शुभम पानपाटील हा दसरा सणानिमित्त आपल्या मुलींना भेटण्यासाठी मनमाड येथून नाशिकला आला होता. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, प्रबुद्धनगर येथून तो घरी जात असताना संशयितांनी त्याला अडविले. त्यानंतर तलवार, कोयता, लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली. या हल्ल्यात शुभमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचे फिर्यादीत
म्हटले आहे.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, पोलीस उपनिरीक्षक बोरसे आणि पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Youth attacked with a machete and a rod in Satpur

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

1 day ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago