नाशिक

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांनाही बेदम मारहाण; तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्रानेच फिरण्याच्या बहाण्याने बोलावून दोन साथीदारांसह एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांनाही संशयितांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी संगीता सुनील यशवंते (वय 50, रा. सिद्धार्थनगर, पाल ढाब्यासमोर, उपनगर) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत संजय अहिरे, अमोल राजेश पगारे आणि अतुल श्यामराव पगारे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता यशवंते यांचा मुलगा कुणाल यशवंते याला दि. 4 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास त्याचा मित्र अनिकेत अहिरे याने बाहेर फिरून येऊ, असे म्हणून घरातून बोलावून घेतले. कुणाल हा अनिकेत व इतर दोन मित्रांसोबत बाहेर गेला. मात्र, त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात कुणालने त्याच्या वडिलांच्या मोबाइलवर फोन करून अत्यंत घाबरलेल्या आवाजात माहिती दिली की, मला अनिकेत अहिरे, अमोल पगारे आणि अतुल पगारे हे सिद्धार्थनगरमधील समाजमंदिरापाशी खूप मारहाण करत आहेत.
मुलाचा फोन येताच आई आणि वडिलांनी तातडीने समाजमंदिराकडे धाव घेतली. त्या ठिकाणी संशयित अनिकेत, अमोल आणि अतुल हे कुणालला बेदम मारहाण करत होते. त्याच वेळी संशयित अनिकेत याने कुणालचा जीव घेण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जोरदार वार केला. सुदैवाने, कुणालने तो वार हुकवल्यामुळे त्याचा जीव वाचला, मात्र या झटापटीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ झालेल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याचे वडील सुनील यशवंते हे पुढे सरसावले असता, संशयित अतुल आणि अमोल यांनी त्यांनाही अत्यंत अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या संपूर्ण मारहाण आणि झटापटीच्या दरम्यान कुणालच्या गळ्यातील सोन्याची चेन कुठेतरी गहाळ झाली आहे.
घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुणालला त्याच्या पालकांनी तात्काळ नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपनगर पोलिसांनी याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

Youth attacked with intent to kill due to old enmity

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago