नाशिक

राजस्थानातील गॅस रिपेअरिंग कामगाराकडून 51 किलो डोडा चुरा जप्त

पंचवटी : प्रतिनिधी
नशामुक्त नाशिक अभियानांतर्गत अमली पदार्थविरोधी पथकाने पंचवटी परिसरात कारवाई करत राजस्थान येथील एका गॅस रिपेअरिंग कामगाराकडून तब्बल 51 किलो 73 ग्रॅम डोडा
(अफूची बोंडे व चुरा) जप्त केला. या कारवाईत अमली पदार्थासह एकूण 8 लाख 83 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरातील अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत 8 जुलै रोजी अमली पदार्थविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली की, राजस्थान येथील एक व्यक्ती पंचवटीतील दत्तनगर, पेठ रोड परिसरातील राहत्या घरी विक्रीसाठी डोडा चुरा घेऊन आला आहे. या माहितीच्या आधारे अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून संबंधिताच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान 51 किलो 73 ग्रॅम वजनाचा डोडा (अफूची बोंडे व चुरा) हस्तगत करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या संशयिताने आपले नाव सुभाष मंगळाराम बिष्णोई (वय 42, मूळ रा. इसरवालोकी ठाणी, चिराई, ता. तिवरी, जि. जोधपूर, राजस्थान) असे सांगितले. तो गेल्या दहा वर्षांपासून पंचवटी परिसरात वास्तव्यास असून, गॅस रिपेअरिंगचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त अमली पदार्थाचा स्रोत, पुरवठा साखळी आणि इतर संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार भरत डांगळे, बळवंत कोल्हे, संतोष सौंदाणे, पोलीस अंमलदार योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अविनाश
फुलपगारे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भड तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने संयुक्तपणे केली.

51 kg of poppy straw seized from a gas repair worker from Rajasthan.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago