दिंडोरी पोलिसांकडून दोघांना अटक
दिंडोरी : प्रतिनिधी
मजुरीच्या पैशांच्या देण्याघेण्यावरून झालेल्या वादातून 29 वर्षीय तरुणाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना दिंडोरी तालुक्यातील गोळशी येथे घडली. योगेश रघुनाथ लहांगे (वय 29, रा. गोळशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
फिर्यादी अशोक रघुनाथ लहांगे यांच्या तक्रारीनुसार, 17 ऑगस्टला सायंकाळी सहाला मजुरीच्या पैशांवरून वाद झाला होता. या वादातून संशयित अशोक म्हसू गायकवाड (वय 42, रा. गोळशी) आणि किशोर हरी गांगोडे (वय 44, रा. फोपळवाडे) यांनी संगनमत करून योगेशच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले. घटनेनंतर संशयितांनी योगेश दारू पिऊन पडल्याचा बनाव रचला. मात्र, कुटुंबीयांनी धाव घेतली असता /-… 4
Youth brutally murdered in Golshi following a dispute over wages.