मनमाडजवळ वीज पडून तरुणाचा मृत्यू

मनमाड   : आमिन शेख

आज नांदगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाने हजेरी लावली मनमाड नजीक असलेल्या खादगाव येथे  ४.०० वाजेच्या सुमारास वीज पडून शेतमजूर असलेला विलास जंगलू गायकवाड या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असुन या घटनेने सर्व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आह आज दुपारी अचानक पावसाचे वातावरण झाले व विजांच्या कडकडाट सह जोरदार पावसाला सुरवात झाली यावेळी आपल्या घराकडे परतत असताना शेतमजुर विलास जंगलु गायकवाड वय २९ वर्ष याच्यावर  वीज कोसळली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहितीउ मिळताच सबंधित ठिकाणी खादगावचे पोलिस पाटील यांना घटनास्थळी बोलवुन घेतले, पोलिस पाटील यांनी मनमाड पोलिस ठाण्यात कळवले व तहसीलदार स यांना ही माहिती दिली घटनेची माहिती मिळताच तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन  यांनी पाहणी केली व  मयत कुटुंबीयांचे सांत्वन केले व अपघात विमा म्हणून मयत कुटुंबीयांस सरकार कडून ४ लाख रुपये मिळवून देण्या संदर्भात माहिती दिली. जंगलू गायकवाड यांना दीड वर्षाचा लहान मुलगा व तीन महिन्याची मुलगी व म्हातारे आई बाप आहेत आजच्या या घटनेने नांदगाव तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago