महामार्गावरील अपघातात तरुणाचा मृत्यू

इंडिकाची स्विफ्टला धडक; सात जण जखमी

सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्गावरील मनेगाव शिवारात सिन्नर गेस्ट हाउससमोर शनिवारी (7 जून) रात्री 10.45 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात अतुल भारत जगझाप या तरुणाचा मृत्यू झाला. नियंत्रण सुटलेल्या इंडिका व्हिस्टा कारने विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसून स्विफ्ट कारला समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिका व्हिस्टा (एमएच-42 एच-7133) ही कार नाशिकच्या दिशेने जात होती. मनेगाव शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणार्‍या स्विफ्ट कारला (एमएच-12 आरएफ-1036) इंडिकाने जोरदार धडक दिली. अपघातात स्विफ्टचालक गंभीर जखमी झाला. अतुल भारत जगझाप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इंडिका कारमधील सहा जणही जखमी झाले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी इंडिकाचालकाविरोधात सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Youth dies in highway accident

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *