चांदवड तालुक्यातील युवकाचे अपहरण करून अमानुष मारहाण व्हिडीओ व्हायरल…! पोलिस कारवाई करणार का…?
मनमाड : प्रतिनिधी
चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील एका अपंग तरुणाला 6 ते 7 जणांच्या टोळक्याने अपहरण करून एका बंद खोलीत नेऊन काठी लाथा बुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली असुन या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फिरोज पठाण असे त्या पीडित तरुणाचे नाव आहे. दादा गाढे व त्याच्या साथीदारानी फिरोजला अपहरण करून खोलीत डांबून ठेवत अमानुषपणे मारहाण केली आहे.याबाबत पोलीस ठाण्याला कळविले असुन पोलीस कारवाई करतील का असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असेंकी फिरोज पठाण हा पूर्वी दादा गाढे यांच्या पोल्ट्रीफॉम वर कामाला होता मात्र काही महिन्यांपूर्वी त्याने काम सौडून दुसरीकडे काम सुरू केले याचा राग मनात ठेवून दादा गाढे याने त्याच्या नातेवाईक व मित्रांना सोबत घेऊन फिरोजचे अपहरण केले व त्याला लाथ बुक्क्या व लाकडी दांडा तसेच बेल्टने अमानुष मारहाण केली याचा व्हिडीओ करून ठेवला मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू नये यासाठी त्याच्या घरच्यांना दमदाटी करण्यात आली मात्र घरच्यांनी 112 ला फोन करून पोलिसांना सर्व प्रकार सांगितला.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…