नाशिक

पिंपळगाव डुकरा शिवारात युवकाचा खून

अवघ्या 2 तासांत वाडीवर्‍हे पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

अस्वली स्टेशन : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारात अनिल एकनाथ गिर्‍हे (रा. गिर्‍हेवाडी, पिंपळगाव घाडगा, ता. इगतपुरी) या युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी दोन तासांत संशयितांना बेड्या ठोकल्या.
वाडीवर्‍हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग जाधव, पोलीस हवालदार रामकृष्ण लहामटे, मनोज येशी, भगवान खरोले, धोंडिराम बोंबले, विशाल सोनवणे यांनी दोन तासांत संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले. ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वाडीवर्‍हे पोलिसांचे कौतुक केले आहे. खुनाच्या घटनेत पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे नागरिकांनीही कौतुक केले आहे.
अधिक माहिती अशी की, भाडेकरू महिला मंगल वाळू मधे हिचा मोठा भाऊ अजय रंगनाथ पवार व भावजय काजल अजय पवार आठ दिवसांपूर्वी पिंपळगाव डुकरा येथे आले होते. मृत अनिल गिरे व आरोपी अजय पवार हे दोघे रोज एकत्र बसायचे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास काजल पवार हिने मंगलला सांगितले की, अनिल गिर्‍हे आणि अजय पवार हे घरी आल्यानंतर पती मला बोलले की, अनिलची तुझ्यावर वाईट नजर आहे. त्यामुळे त्यांच्यात आपसात भांडण चालू झाले आहे. माझे पती रागाच्या भरात काहीतरी करतील. तुम्ही लवकर घरी चला. दोघी घरी आल्यावर अनिल एकनाथ गिर्‍हे हा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. वाडीवर्‍हे पोलिसांनी अजय रंगनाथ पवारचा परिसरात शोध घेतला. तो एका अंडा भुर्जीच्या गाड्याच्या आडोशाला अंधारात दारूच्या नशेत लपून बसलेला मिळाला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्याने मृत अनिल गिर्‍हे याची माझ्या बायकोवर वाईट नजर होती. त्यामुळे त्याच्याशी गोड बोलून दारू पाजून बहीण मंगल मधेच्या घरी आणून घराच्या मोरीत ठेवलेल्या दगडाने त्याला ठेचून मारल्याचे कबुली दिली. याप्रकरणी अधिक तपास वाडीवर्‍हे पोलिस करीत आहेत.

Youth murdered in Pimpalgaon Dukra Shivara

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…

2 hours ago

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

7 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

7 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

7 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

7 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

8 hours ago