नाशिक

आंतरराज्यीय दरोडेखोर टोळी ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

बारा जणांना अटक, 5 फरार, 19.55 लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस अंतर्गत नाशिक ग्रामीण पोलिसांंनी महामार्गांवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या केरळमधील आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात 19.55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणखी पाच आरोपी फरार आहेत
दि. 11 डिसेंबर 2025 रोजी वाडीवर्‍हे पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-आग्रा महामागार्र्वरील राजूर पाटी परिसरात गुजरात येथील फिर्यादी
धर्मेंद्र पटेल व त्यांचे सहकारी स्कॉर्पिओ कारमधून प्रवास करत असताना अज्ञात आरोपींनी संगनमताने त्यांची गाडी अडवली. फिर्यादीस मारहाण करून डोळ्यांत काहीतरी टाकून बेशुद्ध करण्यात आले व कारमधील चार लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम जबरीने लुटण्यात आली. याप्रकरणी वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व वाडीवर्‍हे पोलीस ठाण्याची पथके सक्रिय झाली. फॉरेन्सिक पथक, श्वानपथक व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी केरळ राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. परराज्यात तपासाची परवानगी घेऊन केरळमधील त्रिचूर जिल्ह्यात छापे टाकून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच पुन्हा नाशिक जिल्ह्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व सिन्नर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने सिन्नर तालुक्यात छापा टाकून आणखी दहा आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून तलवार, गुप्ती, कोयता, चाकू, हातोडे, स्क्रू-ड्रायव्हर, मिरचीपूड, तीन चारचाकी वाहने, मोबाईल फोन, एटीएम व क्रेडिट कार्ड, असा एकूण 19 लाख 55 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. तसेच आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात हे आरोपी केरळमधील सराईत गुन्हेगार असून, महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील महामार्गांवर लूटमार केल्याचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Interstate robbery gang caught by rural police

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

3 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

3 hours ago