नाशिक

मैत्री दिनी पहिने बारीत तरुणाईची धूम!

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
मनासारखा बरसणारा पाऊस आणि फ्रेंडशिप डेचे (मैत्री दिन) औचित्य साधत रविवारी पर्यटकांनी वर्षा सहलीसाठी त्र्यंबकेश्वर परिसराला पसंती दिली. दमदार पावसामुळे नदी-नाले खळाळून वाहत असून, पहिने परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
पहाडी भागातील नेकलेस धबधबा वर्षा सहलीला येणार्‍या पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. शनिवार व रविवारी मिळून किमान दोन हजार पर्यटक अधिकृत तिकीट काढून धबधबा परिसरात प्रवेश करत आहेत. याशिवाय, त्याहून चारपट अधिक नागरिक आजूबाजूच्या हिरवळीवर आणि नदीच्या प्रवाहात निसर्गसहलीचा आनंद लुटत आहेत. दुगारवाडी धबधबा येथे घडलेल्या अपघातामुळे तेथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. परिणामी, पर्यटकांचा सगळा ओघ पहिने परिसराकडे वळला आहे. याशिवाय अंजनेरी, ब्रह्मगिरी आणि हरिहर किल्ल्यावरही पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नाशिक-त्र्यंबक रस्ता आणि पेगलवाडी फाटा ते पहिने घाट मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.

हुल्लडबाजांचा उच्छाद
काही हुल्लडबाजांचा उपद्रव वाढला असून, बेफाम वेगाने वाहने चालवणे, शिवीगाळ व आपापसांत हाणामारीच्या घटना घडत आहेत. यामुळे स्थानिक नागरिक व कुटुंबासह आलेल्या पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भागात पोलीस बंदोबस्त वाढवून हुल्लडबाजी करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Youthful enthusiasm abounds at Pahine Bari on Friendship Day!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार…

- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…

7 minutes ago

मोबाईलमुळे भविष्य संकटात

- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…

10 minutes ago

नाठाळांच्या माथी हाणा काठी!

- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…

19 minutes ago

ऐतिहासिक स्थळांवर कायमस्वरूपी पर्यटकांचा ओघ वाढावा

- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…

25 minutes ago

खड्ड्यांचे पाप कोणाचे?

- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…

33 minutes ago

ऊर्जेची बचत, यशाची गुरुकिल्ली!

- जगन घाणेकर  वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…

52 minutes ago