नाशिक

भक्तीचा महाकुंभ; णमोकार तीर्थ दुमदुमले!

मालसाणेत पंचकल्याणक महोत्सवाला प्रारंभ; भाविकांची अलोट गर्दी

चांदवड : वार्ताहर
तालुक्यातील मालसाणे येथील नवनिर्मित श्री णमोकार तीर्थ या पावननगरीत शुक्रवारपासून ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाचा मंगलमय प्रारंभ झाला. गणधराचार्य 108 श्री कुंथुसागरजी महाराज आणि आचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात, 351 जिनबिंबांच्या भव्य रथयात्रेने अवघी चांदवडनगरी जैन धर्मीयांच्या जयघोषाने आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटेपासूनच विधींना सुरुवात झाली. यज्ञशाळेत कलश स्थापना आणि अखंड दीप प्रज्ज्वलित करून विश्वशांती यज्ञाचा श्रीगणेशा करण्यात आला. सकाळी 8 ला निघालेल्या भव्य रथयात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तीन बँड पथकांचा निनाद, हत्तीवर विराजमान सौधर्म इंद्र नीलम अजमेरा व कीर्तीजी अजमेरा आणि त्यामागे चालणारे सुवर्ण व चांदीचे रथ यामुळे जणू प्रत्यक्ष स्वर्गच पृथ्वीवर अवतरल्याचा भास होत होता. आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष पेंढारी यांच्या हस्ते मुख्य मंडपाचे उद्घाटन झाले, तर सकाळी 11.20 वाजता मोठ्या जयघोषात मुख्य समवशरण मंदिरात ध्वजारोहण संपन्न झाले. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी, म्हणजेच शनिवारी (7
फेब्रुवारी) विशेष विधींचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता 81 कलशांसह महिलांची भव्य घटयात्रा निघेल. दुपारी 1 वाजता बाल ब्रह्मचारी मोनिकादीदी, निधीदीदी आणि सरला पांडे यांचा जैनैश्वरी दीक्षा हा त्याग आणि वैराग्याचा सोहळा होणार आहे. रात्री 7 वाजता माता लक्ष्मणादेवीचे 16 स्वप्न दर्शन आणि गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार विधी पार पडणार आहे.

मुख्यमंत्र्यांची रविवारी उपस्थिती

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रविवारी (8 फेब्रुवारी) सकाळी 10 ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ आणि आमदार डॉ. राहुल आहेर यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. या विशेष अतिथींच्या उपस्थितीत भव्य धर्मसभा पार पडणार असल्याची माहिती प्रचार-प्रसार संयोजक पारस लोहाडे, विनोद पाटणी व भूषण कासलीवाल यांनी दिली.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

3 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

3 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

3 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

3 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

4 hours ago