नाशिक

तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी गोळा केले 250 कोटी

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप; मंत्री झिरवाळांऐवजी दुसराच कुणीतरी कारभार चालवतोय

मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडाकेबाज कारवाई करत असलेले अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या प्रयत्नांवरून सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा सभागृहातच याबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. आव्हाड यांनी दावा केला की, प्रामाणिक आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंढे यांना या पदावरून हटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रग लॉबीकडून 250 कोटींंचा ’पूल’ (निधी) गोळा करण्यात आला आहे. आव्हाड यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. स्वतः मुंढे यांनी मात्र याबाबत काहीही बोलण्यास नकार देत, आव्हाड स्वतःच याबाबत माहिती देऊ शकतील, असे माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभाग सध्या मंत्री नरहरी झिरवाळ चालवत नसून पडद्यामागून दुसरीच कोणतीतरी शक्ती हा विभाग हाताळत असल्याचा गंभीर आरोपही आव्हाडांनी केला. मंत्री झिरवाळ हे अत्यंत साधे गृहस्थ आहेत. मात्र, त्यांच्यावर सध्या प्रचंड दबाव आहे. इतका दबाव जर दुसर्‍या कोणावर असता तर त्यांनी कधीच राजीनामा दिला असता, असे सांगत आव्हाड यांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले.
मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून औषध आणि खाद्यपदार्थ क्षेत्रातील माफियांचे धाबे दणाणले असून त्यांची विकेट काढण्यासाठी ही मोठी सुपारी घेण्यात आल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून एफडीए विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि औषध भेसळीसारख्या गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांची ही पारदर्शक कार्यपद्धती काही घटकांच्या हिताला बाधा आणणारी ठरली, असा आरोप आव्हाड यांनी केला.
तपासणीसाठी पाठवलेले अन्न आणि औषधांचे नमुने लॅबमध्ये गेले की फेल केले जातात आणि तिथेच सेटलमेंट होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. सभागृहातील या अत्यंत महत्त्वाच्या चर्चेत आमदार अर्जुन खोतकरही सहभागी झाले. तुकाराम मुंढे यांना सध्या जीवे मारण्याच्या धमक्या येत असून त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे शासनाने त्यांना तात्काळ चोख सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी खोतकर यांनी केली.
सभागृहातील या वादळानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सरकारची बाजू मांडली. आयुक्त तुकाराम मुंढे सध्या एफडीएच्या माध्यमातून अतिशय चांगली आणि धडक कारवाई करत आहेत, त्यामुळे त्यांच्या बदलीचा सध्यातरी कोणताही प्रश्नच येत नाही, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली.

₹250 crore raised for Tukaram Mundhe’s transfer.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago