महाराष्ट्र

राज्यातील 75 टक्के शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळणार

मुंबई : प्रतिनिधी
सध्या राज्यातील सुमारे 75 टक्के शेतकर्‍यांना कृषिपंपांसाठी नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. या वर्षाअखेरीस उर्वरित 25 टक्के शेतकर्‍यांनाही दिवसा वीज देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यात सध्या कोणतीही वीजटंचाई नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मे महिन्यात तांत्रिक अडचणींमुळे झालेले अल्पकालीन भारनियमन वगळता सध्या राज्यात भारनियमन नाही. या निर्णयामुळे रात्री-अपरात्री शेतात जाऊन पाणी देण्याच्या त्रासातून राज्यातील सर्वच शेतकर्‍यांची लवकरच मुक्तता होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
शेतकर्‍यांना शाश्वत वीज मिळावी आणि वीजबिलाच्या प्रश्नातून त्यांची कायमची सुटका व्हावी, यासाठी शासनाने ’सौर कृषिपंप योजनेवर’ मोठा भर दिला आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यात दहा लाखांहून अधिक सौरपंप बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, भौगोलिक परिस्थितीनुसार नदीकाठ, कालवे आणि खोल जलस्रोतांसाठी मोनोपोल, बूस्टर आणि तरंगत्या सौर पंपांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच, पाण्याची पातळी खोल गेलेल्या ‘डार्क झोन’ भागातील शेतकर्‍यांसाठी अधिक क्षमतेचे बूस्टर पंप आणि त्यावर विशेष अनुदान देण्याची व्यवस्था शासनाने केली असल्याने तिथल्या शेतकर्‍यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

 

75 percent of farmers in the state will receive electricity during the day.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago