नाशिक

जिल्हा नियोजनचा शंभर टक्के निधी खर्च

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा विकासाचा निधी यंदा प्रथमच डीपीसीचे सदस्य नसलेल्या आमदारांना 70 टक्के, तर राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांना 30 टक्के वितरित करण्यात आला. या फॉर्म्युल्यामुळे निधी संपूर्णपणे खर्च झाला असला तरीही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते नगरपरिषदा, महापालिकेला स्वत:च्या कामांसाठी अन् विरोधी आमदार, खासदारांना एक रुपयाही मिळाला नसल्याने त्यांची नाराजी कायम राहिली. दरम्यान, प्राप्त झालेल्या 1,435 कोटींचा 100 टक्के खर्च करण्याची किमया जिल्हा नियोजन समितीने साधली.
जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने यंदा राज्यस्तरावरूनच निधी वितरणाबाबत अनोखा निर्णय घेण्यात आला. एकूण निधीच्या 70 टक्के निधी हा आमदारांना देण्यात आला. म्हणजे सर्वसाधारण आणि आदिवासी उपयोजना 660 कोटी रुपये देण्यात आले. 30 टक्क्यांप्रमाणे 349 कोटी रुपये हे सत्ताधारी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांमध्ये वितरित करण्याचे ठरले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र पदाधिकार्‍यांना न देता आमदारांद्वारेच हा निधी वितरित केला. म्हणजे आमदार जे काम सुचवतील त्याच कामांसाठी निधी देण्यात आला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वत:च्या स्वच्छतेसह पाणीपुरवठा अन् इतर कामांसाठी पैसेच मिळाले नाहीत. त्यामुळे या लोकप्रतिनिधींनी मात्र एक छदामही न मिळाल्याने विकासकामांसाठी आमदारांवर अवलंवून राहावे लागेल.

असा झाला निधी खर्च
सर्वसाधारण योजना ः 900 कोटी पूर्णपणे खर्च झाले. यातील 450 कोटी हे स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे, तर उर्वरित 450 कोटी विविध विकास योजनांद्वारे खर्च झाले आहेत.
आदिवासी उपयोजना (टीएसपी) ः 434 कोटी 100 टक्के खर्च झाले. पैकी 70 टक्के म्हणजे 260 कोटी जि.प.द्वारे खर्च केले. उर्वरित 174 कोटी योजनांमध्ये शिष्यवृत्ती, वसतिगृहातील विद्यार्थी निधी अन् इतर योजनांसाठी खर्च झाला आहे.
सामाजिक न्याय ः 101 कोटी पूर्णपणे खर्च झाले आहेत.

100% of district planning funds spent

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago