नाशिक

भगवान महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

नाशिक : प्रतिनिधी
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त मंगळवारी (दि. 31) शहरात काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळपासूनच धार्मिक वातावरण तयार झाले होते. दहीपूल येथील श्री धर्मनाथ देरासर येथून शोभायात्रेला सुरुवात होताच अहिंसा परमो धर्मः, जिओ और जीने दो, जय जिनेंद्र, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
शुभ्रवस्त्र परिधान केलेले हजारो महिला, पुरुष, युवक-युवती जैनधर्म ध्वजाखाली एकत्र येत शिस्तबद्ध पद्धतीने शोभायात्रेत सहभागी झाले होते. बॅण्ड पथकांच्या तालावर युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे, धार्मिक संदेश देणारे फलक आणि पोवाड्यांमुळे वातावरण भक्तिमय झाले होते. चिंतामणी पार्श्वनाथ जैन मंदिर, भद्रकाली येथील दिगंबर जैन मंदिर, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा, शालिमारमार्गे ही शोभायात्रा पुढे सरकत नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. या मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टीने स्वागत केले.
शोभायात्रेच्या व्यवस्थापनासाठी जैन सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर नियोजन केले होते. भाविकांच्या सोयीसाठी भालेकर मैदान येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. तेथून शोभायात्रा मार्गावर पोहोचण्यासाठी पिकअप-ड्रॉप सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी टळली व कार्यक्रम सुरळीत पार पडला.
ही शोभायात्रा महाकवी कालिदास कलामंदिर येथे पोहोचल्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आचार्य जकीर्तीजी गुरुदेव यांनी सांगितले की, मानवाने आवश्यकतेपेक्षा अधिक लोभ, संग्रह आणि भौतिक सुखांच्या मागे धावू नये. त्यातूनच अशांतता आणि दुःख निर्माण होते. अहिंसा, सत्य, संयम आणि करुणा या मूल्यांचा स्वीकार केल्यास खरे समाधान मिळू शकते. त्यांनी जगा आणि जगू द्या, हा संदेश आजच्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले.
याप्रसंगी नमिताश्रीजी म.सा. व सजगश्रीजी म.सा. यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात अ‍ॅड. राहुल कासलीवाल यांनी जैन समाजाच्या ऐक्याची ताकद आणि अशा महोत्सवांचे सामाजिक महत्त्व स्पष्ट केले.
जैन सोशल ग्रुप मेनचे अध्यक्ष प्रफुल पारख, जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमचे अध्यक्ष अतुल बोहरा, जैन सोशल ग्रुप ग्रेपसिटीचे अध्यक्ष राजेंद्र कुमट यांच्यासह संपूर्ण जैन सोशल ग्रुपचे सदस्य यावेळी उपस्थित होते.पदाधिकारी, सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पहाडे, महेश शहा आणि ललित मोदी यांनी केले. रवींद्र चोपडा यांनी आभार मानले.

Procession on the occasion of Lord Mahavir Jayanti

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago