नाशिक

जिल्ह्यात अवकाळीचा कहर

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 154 गावांमधील 30 हजार 53 शेतकर्‍यांच्या सुमारे 22 हजार 27 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. गारपीट व वादळी वार्‍यांसह झालेल्या पावसामुळे हाताशी आलेली पिके मातीमोल झाली असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.

यापूर्वीही 18 मार्च रोजी 270 हेक्टर, तर 29 मार्चला 482 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उभ्या पिकांसह काढणीस आलेल्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
मालेगाव, सटाणा, देवळा, नाशिक, निफाड, सिन्नर व चांदवड या तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. विशेषतः सटाणा तालुक्यात अवकाळी पावसाने सर्वाधिक कहर केला असून, मोठ्या क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील इतर काही तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सततच्या अवकाळीमुळे जिल्ह्यातील शेती मोठ्या संकटात सापडली आहे. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदत व पंचनाम्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पीकनिहाय नुकसानीचा आढावा
कांदा : 18,119 हेक्टर,

कांदा रोपवाटिका : 10 हेक्टर

 मका : 267 हेक्टर.

गहू : 1,335 हेक्टर,

भाजीपाला : 199 हेक्टर,

वेलवर्गीय पिके : 15 हेक्टर,

द्राक्षे : 136 हेक्टर,

डाळिंब : 1,858 हेक्टर,

टोमॅटो : 4 हेक्टर,

पेरू : 5.50 हेक्टर,

आंबा : 1.80 हेक्टर.

पुढील चार दिवस सतर्कतेचे
जिल्ह्यात आधीच मोठे नुकसान झालेले असताना 4 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शेतकर्‍यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कांदा, डाळिंबाला सर्वाधिक फटका
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा व डाळिंब या पिकांना बसला आहे. 18 हजार 119 हेक्टरवरील कांदापीक बाधित झाले. 1,858 हेक्टरवरील डाळिंब फळबागांचे नुकसान झाले आहे. गारपीट व पावसामुळे कांद्याची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून, साठवणुकीवरही परिणाम होणार
आहे. डाळिंब फळबागांत फळगळ व रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

♦ 22 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
♦ 30 हजारांहून अधिक शेतकरी बाधित

Unseasonal weather wreaks havoc in the district

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago