नाशिक

त्र्यंबकला 11 दरोडेखोर मुद्देमालासह जेरबंद

वीज उपकेंद्रातील 11 लाखांचे साहित्य केले होते लंपास

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एका वीज उपकेंद्राच्या (इलेक्ट्रिक सबस्टेशन) साइटवर प्राणघातक शस्त्रांचा धाक दाखवत दरोडा टाकणार्‍या 11 संशयितांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी काही तासांतच जेरबंद केले. या कारवाईत दरोड्यातील चोरीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 26) पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास रामकृष्ण इलेक्ट्रिकलचे साइट सुपरवायझर ज्ञानेश्वर अशोक सुळे, तसेच दत्ता मारुती पवार आणि मुकेश प्रदीप नर्पे हे साइटवर उपस्थित असताना 11 जणांच्या टोळीने पिस्तूल व इतर प्राणघातक शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकला. आरोपींनी पाच मोबाइल फोन, साइटवरील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर तसेच इलेक्ट्रिक सबस्टेशनमध्ये वापरण्यात येणार्‍या एसक्यूएम कंडक्टर वायरचे दोन ड्रम असा एकूण 11 लाख 11 हजार 50 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. घटनेनंतर फिर्यादी ज्ञानेश्वर सुळे यांनी तातडीने डायल 112 वर संपर्क साधून त्र्यंबकेश्वर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि गस्तीवरील पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींचा पाठलाग केला. सापळा रचून 11 संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून दरोड्यातील महिंद्रा ट्रॅक्टर, एसक्यूएम कंडक्टर वायर, पाच मोबाइल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, लोखंडी कटर, कुर्‍हाड, तलवार, कोयता, पक्कड आणि स्क्रूड्रायव्हर असा सुमारे 6 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तसेच इतर संभाव्य साथीदारांचा शोध घेण्याचे काम त्र्यंबकेश्वर पोलीस
करीत आहेत.

11 dacoits apprehended with stolen goods in Trimbak.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

18 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

18 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

18 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

18 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

18 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

18 hours ago