नाशिक

मालेगावला 11 दुचाकी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश

सात लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त; बालक ताब्यात, एकजण फरार

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव शहरासह परिसरातील मोटारसायकल चोरीबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 11 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. त्यात सुमारे 7 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार हे मालेगाव शहरातील न उघड मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मोसम पूल परिसरातील बसस्टॉपजवळ एक संशयित विनानंबरची चोरीची मोटारसायकल घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकलच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने व त्याचा साथीदार शहजाद अहमद शकिल अहमद उर्फ शहजाद गुजी (रा. गोल्डन नगर, मालेगाव) यांनी मिळून टेहरे (ता. मालेगाव) येथून ही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत त्यांनी मालेगाव शहर व ग्रामीण भागातील विविध ठिकाणांहून एकूण 11 मोटारसायकली चोरी केल्याचे उघड झाले. या चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी शोएब अन्सारी फय्याज अहमद उर्फ पाप्या चोरखा (वय 31, रा. जाफरनगर, मोहम्मद अली रोड, मालेगाव) याच्याकडे दिल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी शोएब अन्सारी उर्फ पाप्या चोरखा यास ताब्यात घेतले.
त्याच्या ताब्यातून तीन हिरो एचएफ डिलक्स, तीन होंडा युनिकॉर्न, दोन होंडा शाईन, एक होंडा अ‍ॅक्टिव्हा, एक यामाहा एफझेड आणि एक हिरो सीडी डॉन अशा एकूण 11 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे मालेगाव छावणी व पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी शोएब अन्सारी हा साथीदारांकडून चोरीच्या दुचाकी खरेदी करून कमी दरात विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
संबंधित संशयितास मालेगाव छावणी पोलिसांनी अटक केली. दरम्यान, फरार संशयित शहजाद गुजी याचा पोलीस पथक शोध घेत आहेत. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मालेगाव पोलिसांचे आवाहन

या कारवाईत जप्त केलेल्या चोरीच्या दुचाकी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात ठेवल्या आहेत. ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरीस गेल्या आहेत. त्यांनी संबंधित कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात संपर्क साधून खात्री करावी, तसेच नागरिकांनी जुनी दुचाकी खरेदी करताना मूळ कागदपत्रांची पडताळणी करूनच व्यवहार करावा. विनानंबरप्लेट अथवा बनावट नंबरप्लेट लावून कमी दरात दुचाकी विक्रीस आणणार्‍या संशयित व्यक्तींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असेही आवाहन
केले आहे.

11 two-wheeler theft cases busted in Malegaon

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago