नाशिक

पंजाबपर्यंत पाठलाग करून दोन आरोपी जेरबंद

समृद्धी ज्वेलर्स दरोडा प्रकरणी पोलिसांची कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी

पंचवटीतील हिरावाडी परिसरात असलेल्या समृद्धी ज्वेलर्स या सराफी पेढीवर बंदुकीचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न करून पसार झालेल्या टोळीचा नाशिक गुन्हे शाखेने थरारक पद्धतीने पंजाबपर्यंत पाठलाग केला. तब्बल तीन दिवस अहोरात्र शोधमोहीम राबवत पोलिसांनी दोन सराईत आरोपींना जेरबंद केले असून, चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
नाशिकच्या हिरावाडी परिसरातील न्यू समृद्धी ज्वेलर्स येथे दरोड्याचा प्रयत्न करून पसार झालेल्या टोळीचा माग काढत गुन्हे शाखेच्या पथकाने थेट पंजाब गाठले आणि चित्रपटातील थराराला साजेशी कारवाई करत दोन आरोपींना जेरबंद केले. या कारवाईमुळे नाशिक पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
15 मे 2026 रोजी रात्री नऊच्या सुमारास सहा जणांची टोळी न्यू समृद्धी ज्वेलर्समध्ये घुसली. सोने-चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न करत त्यांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. मात्र, काही वेळातच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरोड्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत, किशोर काळे, तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके आणि शेखर देशमुख यांनी गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 1 आणि 2 ची पथके तपासासाठी कामाला लागली.
तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. पोलिस हवालदार विशाल देवरे, प्रशांत मरकड, विशाल काठे, नाझीमखान पठाण, मुक्तार शेख, महेश साळुंखे, राहुल पालखेडे, आप्पा पानतळ, राम बर्डे, गोरक्ष साबळे, नितीन जगताप आणि विलास चारोस्कर यांनी आरोपींच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास करत महत्त्वाची माहिती मिळवली.आरोपी पंजाबमध्ये असल्याचे स्पष्ट होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक मोहालीला रवाना झाले. पोलिसांनी सलग तीन दिवस आणि रात्री आरोपींचा शोध घेत सापळा रचला. अखेर मोहाली परिसरातून हनिषकुमार महेंद्रसिंग (रा. डेराबस्सी, मोहाली) आणि रणजितसिंग दर्शनसिंग (रा. बहादरपूर फकिरा, पटियाला) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांसह दरोड्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. या कारवाईत गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, कैलास तबरे, प्रकाश महाजन, अतुल पाटील, मनोज परदेशी, चंद्रकांत गवळी, तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेचे शेरखान पठाण, समीर चंद्रमोरे, योगेश परदेशी आणि तांत्रिक विश्लेषण शाखेच्या जया तारडे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Two accused arrested after chase to Punjab

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago