अखेर कुंदेवाडीच्या शेतकर्याने ठोठावले पोलिसांचे दार
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यात कॅप्टन खरातचा भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, दैवी शक्ती आणि जादूटोण्याची भीती दाखवून त्याने तालुक्यातील कुंदेवाडी येथील एका शेतकर्याची तब्बल 16.50 एकर जमीन फसवणुकीने हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. तब्बल 22 वर्षे भीतीच्या छायेत राहिलेल्या या शेतकर्याने अखेर धाडस करून गुरुवारी (दि.9) सिन्नर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी अशोककुमार खरात व त्याची पत्नी कल्पना खरात यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कुंदेवाडी (ता. सिन्नर) येथील शिवराम एकनाथ माळी आणि त्यांच्या भावांनी 1997 मध्ये मिरगाव शिवारात सुमारे 15 लाख रुपयांना 16.50 एकर जमीन खरेदी केली होती. शेती करत असताना 2003 मध्ये आरोपी अशोककुमार खरात त्यांच्या शेतात आला. मंत्रोच्चार व पूजाविधी करून त्याने माळी कुटुंबाचा विश्वास संपादन केला. यानंतर तुमच्या कुटुंबावर मोठे संकट आहे, एका भावाचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती दाखवत जमीन विकण्याचा सल्ला दिला. या भीतीच्या छायेत व संमोहनाच्या प्रभावाखाली फिर्यादीकडून 2004 मध्ये सिन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सह्या घेऊन कोणताही मोबदला न देता जमीन स्वतःच्या नावे करून घेतल्याचा आरोप करण्यात
आला आहे.
दरम्यान, भोंदू कॅप्टन खरात याने काही महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या तसेच इतर लोकांचीही अशाच प्रकारे फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्यानंतर माळी यांनी भीती झुगारून पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी फसवणूक (भा.दं.वि. 420), धमकी (506) तसेच नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण करत आहेत.
भीतीत गेले दोन दशके
जमिनीबाबत आणि मोबदल्याबाबत विचारणा केल्यावर आरोपीने ’माझ्याकडे दैवी शक्ती आहे, विरोध केला तर जादूटोणा करून कुटुंबाचा नाश करीन’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. आरोपीचे मोठ्या लोकांशी संबंध असल्याच्या भीतीने माळी कुटुंबाने तब्बल 22 वर्षे मौन बाळगल्याचे समोर आले आहे.
22 years of silence for fear of ‘divine power’
सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अडचणी…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…
सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्यांचे…
नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…
गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…
आज 20 मे, जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिकापालन…