नाशिक

सार्वजनिक बांधकामचे 2270 कोटींचे रस्ता कामे मंजूर

सिंहस्थ आढावा बैठक; वनविभागाच्या माध्यमातून विकासकामांचा आराखडा

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती आली असून, राज्य शासनाने मंजूर केलेल्या रस्ते विकास कामांना मंगळवार दि.29 रोजी झालेल्या सिंहस्थ आढावा बैठकीमध्ये जिल्हा समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता च्या दृष्टीने नियोजनात असलेल्या रस्त्यांच्या कामाला खर्‍या अर्थाने गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जिल्हा नियोजन समितीचे सिंहस्थ आढावा बैठक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, उपजिल्हाधिकारी भारदे, त्रंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देवचक्के आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत नाशिक ग्रामीण पोलीस विभागाचे अंदाजपत्रकात विविध सूचनांचा अंतर्भाव केल्यानंतर त्याची फेर सादरीकरण करण्यात आले. घोटी-त्र्यंबक जवळ या मार्गावरील प्रकल्पाबाबतही चर्चा करण्यात आली व त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निश्चित करण्यात आले.
वनविभागाच्या माध्यमातून ब्रह्मगिरी अंजनेरी हरिहर गड छोटा व मोठा प्रदक्षिणापद यांच्या विकासकामांचा आराखडा सादर करण्यात आला. यावेळी मोठ्या रस्त्यांच्या आराखड्याला मान्यता देण्याच्या विषयावर जिल्हा प्रशासनाने तातडीचे निर्णय घेत या कामांना गती देण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.

Editorial Team

Recent Posts

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

3 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

9 minutes ago

दुष्काळाने त्र्यंबकनगरीवर पाणीकपातीचे सावट

बांधकामांवर पाण्याचा वारेमाप वापर, सिंहस्थ कुंभमेळ्यावरही परिणाम त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी पावसाने वेळेआधीच माघार घेतल्याने आणि…

16 minutes ago

टोमॅटोची ‘लाली’ घसरली; निर्यातबंदीचा फटका

निफाड : तालुका प्रतिनिधी यंदा अत्यल्प पाऊस असतानाही शेतकर्‍यांनी महागडी औषधे, कीटकनाशके व पोषकांची फवारणी…

21 minutes ago

पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…

26 minutes ago

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

31 minutes ago