पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत वापरलेली 4,000 ईव्हीएम जळून खाक

भीषण आगीने स्ट्राँग रूममधील रेकॉर्ड केले नष्ट

कोलकाता : प्रतिनिधी
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील अलिपूर परिसरातील एका शासकीय इमारतीला शुक्रवारी भीषण आग लागल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. या विनाशकारी आगीत नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेली 4,000 इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) जळून पूर्णपणे खाक झाली आहेत.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निकालांनंतर ही सर्व ईव्हीएम मशिन्स सुरक्षिततेच्या कारणास्तव या इमारतीच्या गोदामात (स्ट्राँग रुम) कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली होती. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांना तातडीने पाचारण करण्यात आले, मात्र जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत गोदामातील हजारो ईव्हीएम आणि इतर महत्त्वपूर्ण निवडणूक साहित्य मोठ्या प्रमाणावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. अत्यंत संवेदनशील आणि कडेकोट सुरक्षा असलेल्या ईव्हीएम गोदामात ही आग नेमकी कशी लागली, यामुळे प्रशासनासह संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

 

4,000 EVMs used in West Bengal assembly elections burnt

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *