सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर 46 सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

सिडको : प्रतिनिधी
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. परिमंडळ-1 हद्दीतील विविध पोलिस ठाण्यांच्या अभिलेखावरील 46 सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार दोन वर्षांसाठी नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आणि गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवणार्‍या गुन्हेगारांविरुद्ध तडीपार, एमपीडीए तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश
दिले आहेत. या आदेशानुसार परिमंडळ-1च्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अभिलेखावरील गुन्हेगारांचा आढावा घेतला. विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्त तसेच संबंधित पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संबंधित पोलिस ठाण्यांकडून प्राप्त झालेल्या हद्दपारी प्रस्तावांची चौकशी पूर्ण करून 46 गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आले.
पंचवटीतील सर्वाधिक 19 गुन्हेगार
पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 19 जणांना तडीपार करण्यात आले आहे. त्यामध्ये सुमित दयानंद महाले (21), अजय चंदर फुंदे (22), उदय जयंत जगताप (22), किरण जितेंद्र भटांगे (27), संदीप रघुनाथ आहिरे (33), गौरव एकनाथ थोरात (19), ऋषीकेश उर्फ बाबा गणेश परसे (22), शुभम संतोष बनकर (24), विकास अशोक हेमके (32), विकी उर्फ काळ्या कोयत्या बाळू जाधव (25), जयेश उर्फ जय्या हिरामण दिवे (25), तसेच किरण दत्तात्रय शेळके (33), विकी फिर्ती ठाकूर (31), जनार्दन खंटू बोटके (25), किरण उर्फ पिद्म ज्ञानेश्वर क्षीरसागर (20), गौरव रांजय गांगुर्डे (34), अविनाश गुलाब रणदिवे (29), प्रमोद उर्फ पम्या बाळू चारोस्कर (25) आणि विकी बाळू नेटाबटे (24) यांचा समावेश आहे.
म्हसरूळमधील नऊ जण हद्दपार
म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाबा उर्फ रोशन दशरथ गांगुर्डे (29), हर्षल सुनील बनवे (23), रितेश भाऊसाहेब चव्हाण (22), आदित्य रामदास पिंगळे (22), अमोल उर्फ नान्या किशोर फल्ले (33), कमलेश मनोज गुराणा (27), रिंकेश गणेश सोळंकी (26), प्रिन्स लल्लन राहाणी (20) आणि गुरज चिंतामण पवार (19) यांना तडीपार करण्यात आले आहे.
आडगावमधील दोन, भद्रकालीतील सहा
आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोशन सुधाकर कटारे (24) आणि आकाश अशोक गांगुर्डे (30) यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मयूर किशोर पारचे उर्फ उजैनवाल (23), मयूर सुरेश कदम (32), जिब्रान जमीर शेख (21), लखन उर्फ विशाल चंद्रकांत काशिद (28), नवाज मन्सुर शेख (22) आणि आसिफ सुलतान कोकणी (52) यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.
मुंबई नाका, सरकारवाडा, गंगापूरमधील कारवाई
मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वसीम अब्दुल रहेमान शेख (28) आणि नवाज हरान खान (23) यांच्यावर तडीपारीची कारवाई झाली आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अशोक बंडू पंजारे (24) याला हद्दपार करण्यात आले आहे.
गंगापूरमधील सात
गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी उर्फ बाळा पोपट गांगुर्डे (30), महेश भरत कटारिया (23), सुनील उर्फ गटर्‍या नागू गायकवाड (36), किरण संदीप परदेशी उर्फ किशोर राजपूत (26), गौरव संजय जाधव (22), राहुल दिलीप जाधव (24) आणि समीर अशोक गुंजाळ (19) या सात जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

आणखी प्रस्तावांवर चौकशी सुरू

दरम्यान, काही गुन्हेगारांच्या हद्दपारीच्या प्रस्तावांवर अद्याप चौकशी सुरू असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याविरुद्धही योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. आगामी सण-उत्सव निर्विघ्नपणे पार पडावेत आणि गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहावा यासाठी तडीपारीबरोबरच एमपीडीए आणि मोक्काअंतर्गत कारवाई अधिक व्यापक स्वरूपात करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परिमंडळ-1नुसार कारवाई-पंचवटी 19, म्हसरूळ 9, आडगाव 2, भद्रकाली 6, मुंबई नाका 2, सरकारवाडा 1, गंगापूर 7, एकूण 46.

46 innkeepers deported for two years in the backdrop of festivals

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *