महाराष्ट्र

गद्दारांना 50 कोटी रुपये, शेतकर्‍याला पाच हजार

मतचोरी आणि कायदा-सुव्यवस्थेवरून ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
‘सत्तेतील खुर्ची टिकवण्यासाठी गद्दारांना 50-50 कोटी रुपये देता आणि शेतकर्‍याला पाच हजार रुपये मदत करता, ही सरकारची दानत आहे,’ अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राज्य सरकारवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांच्यासह पक्ष सोडून गेलेल्या आमदारांवर टीका करतानाच त्यांनी मतचोरी, शेतकर्‍यांची परवड, बेरोजगारी आणि कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला धारेवर धरले. ‘हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा,’ असे आव्हानही त्यांनी दिले.
अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर झालेल्या मदत पॅकेजचा प्रत्यक्ष लाभ किती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचला, असा सवाल ठाकरे यांनी केला. शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत मिळत असताना पक्षांतर करणार्‍यांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचा आरोप त्यांनी केला. नमो शेतकरी योजनेचे रखडलेले हप्ते आणि पीकविमा निकषांतील बदलांचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या शेतकरी धोरणावर टीका केली. शाळेच्या सहलीसाठी कपडे घेता येत नसल्याने परभणीतील चौदा वर्षीय युवराज मुधवार याने आत्महत्या केल्याच्या घटनेचा दाखला देत त्यांनी सामान्य कुटुंबांच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष वेधले.
निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. मतदारांचे अधिकार हिरावले जात असतील तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल करत त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे आव्हान दिले. एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातून बाहेर पडलेल्यांवर निशाणा साधताना सत्तेसाठी पक्षात फूट पाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, शिवसेनेची ओळख, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि भगवा झेंडा हिरावून घेता येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरूनही त्यांनी सरकारला घेरले. शस्त्रांसह आलेल्या हल्लेखोरांना पोलिसांचे अडथळे पार करणे कसे शक्य झाले, असा सवाल करत त्यांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणारे तरुण नक्षलवादी नसल्याचे सांगत त्यांनी अभिजित दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. नीट परीक्षेतील पेपरफुटी, बेरोजगारी आणि मतचोरीसारख्या प्रश्नांवर तरुणांचा आवाज दडपण्याऐवजी सरकारने त्यांना उत्तरे द्यावीत, असे ते म्हणाले.
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात महात्मा फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणावर आक्षेप घेतले जात असल्याचा मुद्दाही ठाकरे यांनी उपस्थित केला. सामाजिक समतेचे विचार बाजूला सारून समाजाला जातीय विषमतेकडे नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दसरा मेळाव्याच्या ऐतिहासिक परंपरेचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचा उल्लेख करत त्यांनी शिवसेनेच्या वैचारिक वारशाची आठवण करून दिली. ‘हृदयात राम आणि हाताला काम’ हा संदेश देत धर्माच्या नावावर राजकारण करण्याऐवजी रोजगार आणि विकासावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात सत्ताबदल घडवून आणण्याचे आवाहन करत ‘हम अच्छे दिन लायेंगे’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकणारा भगवा एक दिवस लाल किल्ल्यावरही फडकला पाहिजे, अशी भूमिका मांडत त्यांनी भाषणाचा समारोप केला.

 

50 crore rupees for the traitors, five thousand for the farmer

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago