नाशिक

लेक लाडकी योजनेत 5,069 मुलींना दोन कोटी 53 लाखांचा लाभ

मुलींच्या सक्षमीकरणाला बळ

नाशिक ः प्रतिनिधी
राज्य शासनाच्या लेक लाडकी योजनेंतर्गत सन 2025-26 या कालावधीत पाच हजार 69 लाभार्थींना एकूण दोन कोटी 53 लाख 45 हजारांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठीचा हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
पहिल्या टप्प्यात 20 ऑगस्ट 2025 ला दोन हजार 49 लाभार्थींना एक कोटी दोन लाख 45 हजार रुपये वितरित करण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात 6 फेब्रुवारी 2026 ला तीन हजार 20 लाभार्थींना एक कोटी 51 लाखांंचे अनुदान देण्यात आले. असा एकूण दोन कोटी 53 लाखांचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे. मुलींच्या शिक्षणास चालना देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम आधार निर्माण होत आहे.
लेक लाडकी योजना अशी
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या या योजनेंतर्गत पात्र मुलींना एकूण 1,01,000 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो. 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ लागू आहे. पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील मुली यासाठी पात्र आहेत. कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी असल्यास योजना फक्त मुलीला लागू राहते. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे, तसेच कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. लाभार्थी व मातेचे संयुक्त बँक खाते असणे बंधनकारक आहे. ठराविक टप्प्यांवर कुटुंबनियोजन प्रमाणपत्र सादर करावे लागते.
या योजनेंंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी पहिलीत प्रवेश घेतल्यावर पाच हजार रुपये, सहावीत गेल्यावर सहा हजार रुपये आणि अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये देण्यात येतात. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अंतिम टप्प्यात 75 हजार रुपये दिले जातात. अशा प्रकारे एकूण 1,01,000 रुपयांचा लाभ लाभार्थींना मिळतो.
या अर्जासाठी रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, आधारकार्ड, संयुक्त बँक खात्याचे पासबुक, पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, मुलीचा जन्मदाखला, तसेच आवश्यकतेनुसार कुटुंबनियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पुढील टप्प्यांवर शाळेत प्रवेशाचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी अर्ज संबंधित अंगणवाडी सेविकेकडे शासनाने निर्धारित केलेल्या नमुन्यात सादर करावा. अधिक माहितीसाठी अंगणवाडीसेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा, असेे आवाहन
केलेे आहे.

5,069 girls benefit from Rs 2 crore 53 lakh under Lek Ladki Yojana

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago