नाशिक

शहरात चोवीस तासांत 54 मिमी पाऊस

बुधवारपासून यलो अलर्ट;खड्डयांमुळे नागरिक त्रस्त

नाशिक : प्रतिनिधी
सकाळी काही काळ ऊन पडून दिलासा मिळाल्यानंतर सोमवारी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि सायंकाळी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली, तर खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, जिल्ह्यातील धरणांमध्ये 81.62 टक्के पाणीसाठा झाला असून, हवामान विभागाने बुधवार ते शुक्रवार या कालावधीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
गेल्या 24 तासांत नाशिक शहरात 54 मिमी पावसाची नोंद झाली.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 84.85 टक्के पाणीसाठा असून, धरणातून 4,947 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. होळकर पुलावरून गोदावरी नदीपात्रात 6,298 क्यूसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, आवश्यकतेनुसार विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
आळंदी, वाघाड, ओझरखेड, भावली, वालदेवी, भाम, भोजापूर, हरणबारी आणि केळझर ही धरणे 100 टक्के भरली आहेत. तसेच कादवा, दारणा, पालखेड, काश्यपी, पुणेगाव आणि इतर धरणांतूनही नियंत्रित विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, सततच्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे अधिक खोल झाले असून, वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रमुख चौक आणि मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना प्रवासासाठी अधिक वेळ लागत आहे. पुढील तीन दिवस पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

प्रमुख धरणांचा विसर्ग
गंगापूर 4,947 क्यूसेक     होळकर पूल 6,298 क्यूसेक
दारणा 5,330 क्यूसेक      कादवा 2,319 क्यूसेक
पालखेड 1,986 क्यूसेक    भाम 1,511 क्यूसेक
आळंदी 1,262 क्यूसेक     वालदेवी 1,050 क्यूसेक
काश्यपी 1,000 क्यूसेक  ओझरखेड 872 क्यूसेक
भावली 822 क्यूसेक       पुणेगाव 805 क्यूसेक
भोजापूर 540 क्यूसेक     गौतमी गोदावरी 500 क्यूसेक
नांदूरमध्यमेश्वर बंधारा 46,227 क्यूसेक

अशी आहे स्थिती
जिल्ह्यातील एकूण जलसाठा 81.62%
गंगापूर धरणातील साठा 84.85%
शहरात 24 तासांत पाऊस 47.4 मिमी
बुधवार ते शुक्रवार यलो अलर्ट
नऊ धरणे 100 टक्के भरली

54 mm of rainfall in the city in 24 hours.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

19 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

19 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

19 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

19 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

19 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

19 hours ago